IND vs ENG : 'लाजीरवाणी गोष्ट...', काहीही कारण नसताना जेम्स अँडरसन विराट कोहलीवर का भडकला?

James Anderson on Virat Kohli : पुत्ररत्न प्राप्त झाल्याने टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.

| Mar 02, 2024, 16:25 PM IST

IND vs ENG Dharmashala Test : बीसीसीआयने देखील वैयक्तिक कारणामुळे विराट कोहलीची सुट्टी मंजूर केली अन् रोहितच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आली.

1/7

जेम्स अँडरसन नाराज

युवा खेळाडूंसह रोहितने मालिका देखील खिशात घातली आहे. मात्र, आता विराटच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंडच्या स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन याने नाराजी व्यक्त केली.

2/7

विराट कोहली

मला नेहमी सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळायचं आहे आणि विराट कोहली या मालिकेचा भाग नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असं जेम्स अँडरसन म्हणाला आहे. 

3/7

विराट आव्हानात्मक

एक टीम म्हणून तुम्हाला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध खेळायची इच्छा असते आणि विराट असा आहे की ज्याला गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासाठी गोलंदाजी करणं खूप आव्हानात्मक आहे, असंही तो म्हणतो.

4/7

महान खेळाडू

मला वाटतं की इंग्लंडच्या चाहत्यांना आनंद होईल की तो खेळत नाही, कारण तो एक महान खेळाडू आहे. परंतु माझ्या दृष्टिकोनातून मला स्वतःची चाचणी घ्यायची होती, असं म्हणत अँडरसनने नाराजी व्यक्त केली आहे.

5/7

स्वत:ची परीक्षा

विराट कोहलीविरुद्ध खेळणं म्हणजे आपली स्वत:ची एक परीक्षा असते. मात्र, यावेळी मला ती संधी मिळाली नाही. पण आम्ही 2025 मध्ये नक्कीच त्याचा सामना करू, असं अँडरसनने म्हटलं आहे.

6/7

जेम्स अँडरसन

जेम्स अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात दिसला होता. त्यानंतर इंग्लंडने फास्टर गोलंदाजा्ंना जास्त संधी दिली नाही. बेन स्टोक्स फिरकीवर जोर दिल्याचं पहायला मिळालं होतं.

7/7

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 :

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.