शौक बडी चिज है! विराटसारखंच टीम इंडियातील या फलंदाजालाही टॅटूचं वेड

भारत विरुद्ध इंग्लंड आज टी 20 पाचवा सामना होत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टीम इंडियातील या फलंदाजाला कर्णधार विराट कोहलीसारखाच एक छंद आहे. हा फलंदाज कोण आणि विराट कोहलीसारखंच कोणत्या गोष्टीचं वेड आहे जाणून घेऊन

Mar 20, 2021, 14:41 PM IST
1/4

चौथ्या टी 20 सामन्यात केली कमाल

चौथ्या टी 20 सामन्यात केली कमाल

सूर्यकुमार यादवनं टी 20 सामन्यामध्ये 57 धावा केल्या. 31 चेंडूमध्ये त्यानं 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत टी 20मधून पदार्पण केलं. सूर्यकुमारला विराट कोहलीसारखंच टॅटू काढण्याचं वेड आहे.   

2/4

उजव्या हातावर आई-वडिलांचा टॅटू

उजव्या हातावर आई-वडिलांचा टॅटू

सूर्यकुमारच्या उजव्या हातावर आई-वडिलांचा टॅटू आहे. सूर्यकुमारला त्याच्या आई-वडिलांचा इतका जिव्हाळा आहे की त्याने आपल्या उजव्या हाताला टॅटू काढून घेतला आहे. 

3/4

सूर्यकुमारचे वडील काय करतात?

सूर्यकुमारचे वडील काय करतात?

 सूर्यकुमार यादवचे वडील अशोक कुमार यादव हे भाभा अणु संशोधन केंद्रात विद्युत अभियंता आहेत.

4/4

बॅटमिंटन की क्रिकेट

बॅटमिंटन की क्रिकेट

सुरुवातीच्या दिवसांमध्ये सूर्यकुमारनं बॅडमिंटन देखील खेळत होता. मात्र वडिलांनी दोन्हीपैकी एकाचीच निवड करण्यास सांगितलं. त्यानंतर वडिलांनी विलास गोडबोले यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवलं. त्यानं भारतासाठी खेळावं अशी आई-वडिलांचं स्वप्न होतं. सूर्यकुमारनं ते पूर्ण केलं.