IND vs PAK सामन्याची अचानक तारीख बदलली; पाहा नेमकं कारण काय?

IND vs PAK, World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. 

Jul 31, 2023, 21:19 PM IST

IND vs PAK Match Date:  भारत आणि पाकिस्तान म्हणजे पारंपारिक प्रतिस्पर्धी. ज्यावेळी दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने येतात, तेव्हा संपूर्ण देशात जणूकाही एकप्रकारे कर्फ्यू लागलेला असतो. अशातच आता आगामी वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

1/5

गुड न्यूज

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. अशातच आता सर्वांसाठी गुड न्यूज मिळाली आहे.

2/5

14 ऑक्टोबर

वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना आता एक दिवस आधी म्हणजेच 15 ऑक्टोबरऐवजी 14 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

3/5

अधिकृत घोषणा कधी?

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयसीसीच्या संमतीने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीये. मात्र, यावर अधिकृत घोषणा झाली नाही.

4/5

नवरात्रोत्सव

भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नवरात्रोत्सव देखील 15 ऑक्टोबरपासून सुरू होतोय. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

5/5

कोणत्या खेळाडूंना संधी ?

दरम्यान, वर्ल्ड कपपूर्वी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येणार असल्याने आता कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.