2011 चा इतिहास पुन्हा लिहिला जाणार... सध्याच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील विचित्र योगायोग!

Ind vs Sa world cup 2011 च्या विश्वचषकामध्ये देखील आयर्लंडने इंग्लंड संघाचा पराभव केला होता, त्याचबरोबर...

Nov 02, 2022, 23:28 PM IST

म्हणतात ना, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ... असंच काहीसं घडतंय सध्या सुरू असलेल्या T20 World Cup 2022 मध्ये... टीम इंडिया तोच इतिहास पुन्हा एकदा नोंदवणार का? पुन्हा टीम इंडिया 15 वर्षानंतर World Cup जिंकणार का? असे प्रश्न सध्या एका लिंकमुळे विचारले जात आहे.

1/5

ind vs sa t20 world cup 2022 team india 2011 world cup coincidence goes viral after loss against south africa 5

T20 विश्वचषकात अखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाची विजयी घोडदौड रोखली. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर, दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली. मात्र, पराभवानंतर देखील भारतीय चाहते फारसे दु:खी नाहीत, कारण ठरलं 2011 चा वर्ल्डकप...

2/5

ind vs sa t20 world cup 2022 team india 2011 world cup coincidence goes viral after loss against south africa 4

49 धावांत 5 गडी गमावल्यानंतरही सूर्यकुमार यादवच्या 40 चेंडूत 68 धावांच्या जोरावर भारताने 9 गडी गमावून 133 धावा केल्या होत्या. सध्याच्या वर्ल्ड कपचं आणि 2011 च्या वर्ल्ड कपचं काय कनेक्शन आहे? ज्याच्या मदतीने टीम इंडिया 15 वर्षांचा दुष्काळ संपवू शकते, असा सवाल उपस्थित केला जातोय.

3/5

ind vs sa t20 world cup 2022 team india 2011 world cup coincidence goes viral after loss against south africa 3

2011 च्या विश्वचषकात टीम इंडियाचा साखळी टप्प्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला होता आणि त्यानंतर टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करून सलग विजय नोंदवत वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळेच चाहत्यांचा तो संपर्क जोडला आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा 15 वर्षांचा दुष्काळ आता संपुष्टात येईल, असं त्यांना वाटतं.

4/5

ind vs sa t20 world cup 2022 team india 2011 world cup coincidence goes viral after loss against south africa 2

2011 च्या विश्वचषकामध्ये साखळी टप्प्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 297 धावांचे लक्ष्य दिलं होतं, जे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2 चेंडू बाकी असताना 7 विकेट गमावून पूर्ण केलं. योगायोगाने रविवारी पर्थमध्ये खेळलेला सामना दक्षिण आफ्रिकेने 2 चेंडू राखून जिंकला.

5/5

ind vs sa t20 world cup 2022 team india 2011 world cup coincidence goes viral after loss against south africa 1

दरम्यान, इतकंच नाही तर 2011 च्या विश्वचषकामध्ये देखील आयर्लंडने इंग्लंड संघाचा पराभव केला होता आणि या T20 विश्वचषकातही आयर्लंडने इंग्लंड संघाचा पराभव करून मोठा उलटफेर केला होता.