भारतासह जगातील या देशातही 15 ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन

भारतासह जगातील या पाच देशांमध्ये  15 ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन. जाणून घ्या हे कोणते देश आहेत. याचा इतिहास काय  आहे जाणून घेऊया. 

Aug 14, 2023, 23:32 PM IST

Independence Day:  15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला. यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, भारतासह जगातील या देशातही 15 ऑगस्टला   स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 5 देशांमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

 

1/5

भारत

भारताचा 77 व्या स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. 1947 रोजी भारत देश ब्रिटीशांच्या गुलागिरीतून मुक्त झाला. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर भारताना स्वातंत्र्य मिळाले. 

2/5

काँगो

19व्या शतकात काँगो नदी हा जगातील प्रमुख व्यापारी मार्ग होता. 1880 मध्ये, काँगोला एका करारानुसार फ्रान्सने जोडले गेले. 1891 मध्ये फ्रान्सने काँगोवर पूर्ण ताबा मिळवला. कालांतराने काँगोच्या लोकांनीही स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. त्यांच्या लढ्याला यश आले. अखेरीस, 15 ऑगस्ट 1960 रोजी, काँगो फ्रेंच गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त झाला.

3/5

बहारीन

बहरीन भारतानंतर म्हणजेच 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त मिळाले. बहरीन 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करत नाही.  बहरीन 16-17 डिसेंबर रोजी आपला राष्ट्रीय दिवस साजरा करतो.  कारण या दिवशी माजी शासक इसा बिन सलमान अल खलिफा सिंहासनावर बसले होते. 

4/5

दक्षिण कोरिया

15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी गुलामगिरीतून मुक्त झाला. कोरिया द्वीपकल्प केवळ तीन वर्षांनंतर 9 सप्टेंबर 1948 रोजी दोन भागात विभागला गेला. याला दक्षिणेला दक्षिण कोरिया असे नाव देण्यात आले.   येथे लोकशाही प्रस्थापित झाली. आज हा देश लोकशाहीचे उदाहरण आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी हा  एक देश आहे. दक्षिण कोरियाचे अनेक ब्रँड जगात प्रसिद्ध आहेत. 

5/5

उत्तर कोरिया

15 ऑगस्ट 1945 रोजी उत्तर कोरिया मुक्त झाला. अमेरिकन आणि सोव्हिएत सैन्याने दुसऱ्या महायुद्धात कोरियन द्वीपकल्प जपानपासून मुक्त केले. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शासकाचा पराभव झाल्यानंतर कोरियन द्वीपकल्प पूर्णपणे स्वतंत्र झाला.