मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नवी जबाबदारी, आता निवडणूक आयोगासाठी 'फलंदाजी' करणार
Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता जवळपास दहा वर्ष उलटली आहेत. पण त्याची क्रेझ आजही कायम आहे. त्याच्याच लोकप्रियतेचा उपयोग आता मतदारांना जागरुक करण्यासाठी करण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) सचिने तेंडुलकरबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे.
1/7
2/7
नवी दिल्लीतल्या आकाशवाणी रंग भवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुढील 3 वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
3/7
4/7
भारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरूणांची राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका आहे, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प्रोत्साहन देताना, इंडिया..इंडिया असा जयघोष करणारी 'टमि इंडिया' समृद्ध लोकशाहीला पुढे नेण्यासाठी नक्कीच समोर येईल, असा विश्वास यावेळी सचिन तेंडुलकरने व्यक्त केला.
5/7
सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मतदानाचा हक्क बजावणं. ज्याप्रमाणे एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियमवर प्रचंड गर्दी जमते त्याप्रमाणेच प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रावरही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी आणि उत्साह कायम ठेवूया असा आशावाद सचिन तेंडुलकरने व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरूण मतदार निवडणुकीत सहभागी होणार, तेव्हाच आपला देश अधिक समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करेल असंही सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
6/7
सचिन तेंडुलकर भारताचेच नव्हे तर जागतिक स्तरावरील आदणीय खेळाडु व्यक्तीमत्व आहेत. त्यांची क्रिकेटची संपूर्ण कारकीर्द प्रशंसनीय उल्लेखनीय, टिमवर्क आणि यशासाठी अथक प्रयत्नांची कटिबद्धता असल्याचे आपण पाहिलेले आहे. यामुळेच ईसीआयची फलंदाजी करण्यासाठी त्यातून मतदांराची संख्या वाढविण्यासाठी ते एक आदर्श पर्याय ठरतील असं मुख्य निवडणूक आयुस्त राजीव कुमार यांनी म्हटलंय.
7/7