Gold ATM: आता एटीएममधून मिळणार सोनं, मशिन कशी काम करते जाणून घ्या

Gold ATM: देशभरात एटीएम सुविधा असून त्यातून तुम्ही आतापर्यंत पैसे काढले असतीलच. पण आता तुम्ही एटीएममधूनही सोने काढू शकणार आहात. भारतात पहिले गोल्ड एटीएम सुरु झालं आहे. या एटीएमद्वारे लोक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून सोने खरेदी करू शकतात. या एटीएममधून 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी खरेदी करता येतील. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देशातील पहिले रिअल टाइम सोन्याचे एटीएम बसवण्यात आले आहे.

Dec 06, 2022, 14:21 PM IST
1/5

Gold ATM

ओपनक्यूब टेक्नॉलॉजीजच्या मदतीने हैदराबादस्थित कंपनी गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेडने देशातील पहिले सोन्याचे एटीएम स्थापित केले आहे. या एटीएमद्वारे ग्राहक सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकतात. हे एटीएम सामान्य एटीएम प्रमाणेच काम करते.

2/5

Gold ATM

कंपनीचे सीईओ सी. तरुज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एटीएममधून लोक 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी काढू किंवा खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर या एटीएमवरील सोन्याची किंमत थेट अपडेट केली जाईल, जेणेकरून फसवणूक होणार नाही. या गोल्ड एटीएमची सेवा 24 तास उपलब्ध असेल.

3/5

Gold ATM

कंपनीचे सीईओ सी. तरुज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी देशभरात आणखी काही एटीएम उघडणार आहे. कंपनी पेड्डापल्ली, वारंगल आणि करीमनगर येथेही गोल्ड एटीएम उघडण्याचा विचारात आहे. याशिवाय, पुढील 2 वर्षांत भारतभर सुमारे 3,000 गोल्ड एटीएम उघडण्याची कंपनीची योजना आहे.

4/5

Gold ATM

गेल्या वर्षी हरियाणातील गुरुग्राममध्ये देशातील पहिले ग्रीन एटीएम बसवण्यात आले होते. त्यावेळी अन्न आणि पुरवठा विभागाचे प्रभारी आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले होते की, धान्याचे एटीएम बसवल्यानंतर सरकारी दुकानातून रेशन घेणाऱ्यांच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातील. अशाप्रकारे आता देशात विविध प्रकारचे एटीएम बसवले जात आहेत.

5/5

Gold ATM

हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले होते की हे मशीन बसवण्याचा उद्देश “राइट क्वांटिटी टू राइट बेनिफिशरी” आहे. यामुळे केवळ ग्राहकांनाच फायदा होणार नाही, तर सरकारी डेपोतील धान्य टंचाईचा त्रासही संपेल, असे ते म्हणाले.