Lockdown : आठव्या दिवशी देशात 'सन्नाटा ही सन्नाटा'

Apr 01, 2020, 11:57 AM IST
1/5

Lockdown : आठव्या दिवशी देशात 'सन्नाटा ही सन्नाटा'

देशभरात लॉकडाऊन सुरु होऊन आता आठ दिवस उलटले आहेत. २५ मार्चपासून सुरु झालेल्या या लॉकडाऊनमधी.ल एक- एक दिवस पुढे जात असतानाच Coronavirus कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी ही एक प्रार्थना सर्वजण करत आहेत. संपूर्ण जगालाच अतिशय मोठ्या संकटात टाकणाऱ्या या कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव भारतातही पाहायला मिळत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे एक हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी काहींवर उपचार करुन त्यांना स्वगृही पाठवण्यात आलं आहे.   

2/5

Lockdown : आठव्या दिवशी देशात 'सन्नाटा ही सन्नाटा'

एकिकडे कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असतानाच दुसरीकडे लॉकडाऊनमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये भयावह शांतता पाहायला मिळत आहे.जयपूर येथे कायम वर्दळ असणाऱ्या ठिकाणी काही अपवाद वगळता कोणाचीही ये-जा दिसत नाही आहे. 

3/5

Lockdown : आठव्या दिवशी देशात 'सन्नाटा ही सन्नाटा'

श्रीनगर येथील अब्दुल्ला पूलावरही दिसणारी नेहमीची गर्दी आता दिसेनाशी झाली आहे. (छाया सौजन्य- इरफान शाह) 

4/5

Lockdown : आठव्या दिवशी देशात 'सन्नाटा ही सन्नाटा'

सध्या आलेलं कोरोनाचं संकट आणि वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवाया पाहता श्रीनगर भागात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. (छाया सौजन्य- इरफान शाह) 

5/5

Lockdown : आठव्या दिवशी देशात 'सन्नाटा ही सन्नाटा'

(छाया सौजन्य- इरफान शाह)