तब्बल 256 डबे, भारतात आहे जगातील सर्वात लांब ट्रेन! एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला लागतो एक तास

Super Vasuki Train : सुपर वासुकी ट्रेन कोणत्या मार्गावर धावते? या ट्रेनचा प्रवास किती तासांचा असतो? जाणून घेवूया.

Mar 10, 2024, 20:07 PM IST

Indian Railway Super Vasuki Train : सरकारच्या 'आझादी का अमृत महोत्सव' या उपक्रमाअंतर्गत 15 ऑगस्ट 2022 मध्ये सुपर वासुकी मालवाहू ट्रेन (Super Vasuki freight train) चालवण्यात आली.  सुपर वासुकी ही भारतातील सर्वात लांब ट्रेन आहे. 

 

1/7

काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वे पोहचली आहे. 

2/7

 छत्तीसगड ते महाराष्ट्रातील नागपूर असा या ट्रेनचा प्रवास पूर्ण होण्यास 11.20 तासांचा कालावधी लागतो.   

3/7

सुपर वासुकी ट्रेनची लांबी 3.5 किमी इतकी असून पायी चालत जायचे म्हंटले तर  एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला तब्बल एक तास लागतो.

4/7

सुपर वासुकी (Super Vasuki)  ट्रेनला 256 डबे आहेत. या ट्रेनल तब्बल 6 जोडलेले असतात. 

5/7

सुपर वासुकी (Super Vasuki)  ही मालवाहू ट्रेन आहे. 27,000 टन वजनाचा माल वाहून नेण्याची क्षमता आहे.  

6/7

सुपर वासुकी (Super Vasuki)  भारतातील सर्वात लांब आणि  सर्वात जास्त डब्बे असलेली ट्रेन आहे. 

7/7

भारतात अनेक एक्पसप्रेस ट्रेन धावतात. या ट्रेनला अनेक डबे जोडलेले असतात.