रणबीर-आलियाच्या चित्रपटाला दिला नकार, ब्लॅक लिस्ट झाला सिद्धांत चतुर्वेदी

सिद्धांत चतुर्वेदी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला रायजिंग स्टार देखील म्हणता येईल. सिद्धांतनं 'गली बॉय' या चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या यादीत लाखो लोकांची वाढ झाली. पण तुम्हाला माहितीये त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाला नकार दिल्यामुळे 'कास्टिंग सर्कल'मध्ये त्याला ब्लॅकलिस्ट केल्याचा खुलासा केला.  

| Mar 10, 2024, 17:12 PM IST
1/7

मुलाखतीत केला सिद्धांतनं मोठा खुलासा

सिद्धांतनं 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की त्याच्या करिअरमध्ये एक काळ असा आला की त्याला फक्त बॉयकॉट केलं नाही तर त्यासोबत ब्लॅकलिस्ट देखील केलं. 

2/7

मोठा प्रोजेक्ट केला नाही म्हणून...

"सिद्धांतनं सांगितलं की मी एक मोठा प्रोजेक्ट करु शकलो नाही. त्यानंतर लागोपाठ मोठे बॅनर्स, कास्टिंग एजंसीज आणि प्रोड्यूसर्सनं मला रिजेक्ट करायला सुरुवात केली." 

3/7

"मला कास्टिंगमधून ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. असं म्हटलं की तू एका पागल मुलगा आहेस. त्यांचं म्हणणं होतं की मला सिलेक्ट केलं तरी मी नाही बोलतो."   

4/7

"मोठ्या बॅनरनं मला चित्रपटाची ऑफर दिली. कास्टिंग डायरेक्टरनं मला त्यासाठी बोलावलं. मला भूमिका सांगितली आणि स्क्रिप्ट नसल्याचं सांगितलं त्याशिवाय मला ऑडिशन देण्याची गरज नसल्याचं देखील सांगितलं." 

5/7

"अॅक्शन फॅन्टसी चित्रपट आहे, तुला मार्शलाट्स करायचं आहे, एक आश्रम आहे, त्यात मला एका सुपरहीरोची भूमिका आहे. त्यांनी सांगितलं की तू हा चित्रपट करायला हवा, कारण खूप जास्त व्हीएफएक्स असतील आणि 5 वर्षात बनून तयार होणार." 

6/7

"मी त्या कास्टिंग डायरेक्टरला सांगितलं की मी ही भूमिका करु शकणार नाही. तो उभा राहिला, पागल आहेस का, धर्माचा आहे, 3 चित्रपटांचा कॉन्ट्रॅक्ट आहे असं सांगितलं." 

7/7

"मी म्हणालो मला कोण बघणार जर त्यात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसारखे मोठे कलाकार असतील तर. त्यानंतर मला त्यांनी ब्लॅकलिस्ट केलं. चांगली गोष्ट म्हणजे तो चित्रपट व्हायला फार वेळ लागाला आणि तो पर्यंत 'गली बॉय' आला. मला वाटतंय की त्या चित्रपटातील ती भूमिका एडीट देखील करण्यात आली. चित्रपटात ते दिसलं नाही. जे पण होतं चांगल्यासाठी होतं."