भारत-पाकिस्ताचे गोल्डन बॉय! नीरज-नदीममध्ये वजन, उंची, शिक्षणात कोण पुढे? कोण मागे? ऐकून वाटेल आश्चर्य

भारत-पाकिस्तानचे हे गोल्डन बॉय शिक्षणात कसे आहेत? दोघांच्या कॉलेज लाईफवर एक नजर टाकूया.

| Aug 09, 2024, 09:06 AM IST

Neeraj Chopra And Arshad Nadeem:भारत-पाकिस्तानचे हे गोल्डन बॉय शिक्षणात कसे आहेत? दोघांच्या कॉलेज लाईफवर एक नजर टाकूया.

1/7

भारत-पाकिस्ताचे गोल्डन बॉय! नीरज-नदीममध्ये वजन, उंची, शिक्षणात कोण पुढे? कोण मागे? ऐकून वाटेल आश्चर्य

India Pakistan golden Boy Neeraj Chopra and Arshad nadeem Height Weight Education Career Details

Neeraj Chopra And Arshad Nadeem:पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकीत नीरज चोप्राने 89.45 मीटर स्कोर करुन सिल्व्हर मेडल आपल्या नावावर केलं. तर 92.97 मीटर स्कोर करत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने गोल्ड मेडल जिंकले. भारत-पाकिस्तानचे हे गोल्डन बॉय शिक्षणात कसे आहेत? दोघांच्या कॉलेज लाईफवर एक नजर टाकूया. 

2/7

पॅरिस ऑलिम्पिक 2024

India Pakistan golden Boy Neeraj Chopra and Arshad nadeem Height Weight Education Career Details

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नीरज चोप्रा पुन्हा एकदा आपल्या कामगिरीचा डंका वाजवला. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले. नीरज चोप्राने 89.45 मीटर स्कोर करुन सिल्व्हर मेडल आपल्या नावावर केलं. 

3/7

नीरज चोप्रा

India Pakistan golden Boy Neeraj Chopra and Arshad nadeem Height Weight Education Career Details

नीरज चोप्राने ऑलिम्पिकच्या इतिहासात सलग दोनदा मेडल आपल्या नावावर करण्याचा रेकॉर्ड केलाय. नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणामध्ये झाला. तो हरियाणाच्या पानिपतमधील खांडरा गावचा राहणार आहे.

4/7

नीरजचे शिक्षण

India Pakistan golden Boy Neeraj Chopra and Arshad nadeem Height Weight Education Career Details

नीरज चोप्राने आपले प्राथमिक शिक्षण बीवीएन पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं. यानंतर चंदीगडच्या डीएवी म्हणजेच दयानंद एंग्लो वेदिक कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीतून बीएची पदवीदेखील घेतली.

5/7

अर्शद नदीम

India Pakistan golden Boy Neeraj Chopra and Arshad nadeem Height Weight Education Career Details

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकच्या फायनलमध्ये 92.97 मीटरचा रेकॉर्ड ब्रेक थ्रो करुन अर्शद नदीमने गोल्ड मेडल आपल्या नावावर केलं. 27 वर्षाच्या अर्शद नदीमचा जन्म 2 जानेवारी 1997 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मिया चन्नू शहराजवळच्या छोट्या खेड्यात झाला. त्याचे वडील मजूरी करुन 400 ते 500 रुपये कमवायचे.

6/7

कितवी शिकलाय अर्शद नदीम?

India Pakistan golden Boy Neeraj Chopra and Arshad nadeem Height Weight Education Career Details

अर्शद नदीमचे शिक्षण मिया चन्नू शहरामध्ये झालंय. सातवीला असताना स्पोर्ट्स डेव्हलपमेंटचे प्रमुख रशीद अहमद साकी यांचे लक्ष त्याने वेधून घेतले. नदीमच्या कॉलेज शिक्षणाबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला सरकारी कोट्यातून नोकरी हवी होती. त्यामुळे तो या खेळाकडे वळल्याचे सांगितले जाते. 

7/7

वजन, उंची

India Pakistan golden Boy Neeraj Chopra and Arshad nadeem Height Weight Education Career Details

नीरज चोप्राची उंची 1.86 मीटर म्हणजेच  6.1 फूट इतकी आहे. तर त्याचे वजन 86 किलो इतके आहे. दुसरीकडे अर्शद नदीमची उंची 1.92 मीटर म्हणजेच 6.4 फूट इतकी आहे. तर अर्शदचे वजन 95 किलो इतके आहे.