12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळणारा महाराष्ट्रातील अजस्त्र धबधबा! पाण्याचा प्रवाह पाहून धडकी भरते

महाराष्ट्रातील हा अनोखा धबधबा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून पर्यटक येथे येतात.

| Jul 27, 2024, 23:59 PM IST

Nandurbar Baradhara Waterfall : महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये तसेच अनेक ठिकाणी उंचावरुन कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य खुलून येते. प्रत्येक धबधब्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असाच एक अनोखा धबधबा आहे. येथे 12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळते. यामुळे हा धबधबा बारामुखी धबधबा नावाने देखील प्रसिद्ध आहे. 

1/7

12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळणारा महाराष्ट्रातील धबधबा भारतातील एकमेव ठिकाण आहे.   

2/7

सरकारने या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षित कठडे बांधावे जेणेकरून पावसाळ्यामध्ये पर्यटन या ठिकाणी सुरू होऊ शकेल आणि या भागातल्या आदिवासी बांधवांना रोजगाराचे एक नाव साधन उपलब्ध होईल अशी मागणी स्थानिक करत आहेत.

3/7

या धबधब्याचे सुंदर रूप पाहून येथे येणाऱ्यांना धबधब्यात भिजण्याचा मोह टाळता येत नाही. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा या ठिकाणी मृत्यू देखील होतो.

4/7

हा धबधबा सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतो. उंच कड्यावरून पडणाऱ्या बारा पाण्याच्या धारा या नर्मदा नदीला जाऊन मिळतात. हा धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा देखील आहे.  

5/7

12 विविध ठिकाणावरून एकच धबधबा वाहण्याच बहुदा हे देशातलं एकमेव ठिकाण असेल. एकाच डोंगरावरून बारा ठिकाणावरून कोसळणारा हा धबधबा आपलं रौद्ररूप धारण करतो, तेव्हा चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडते.

6/7

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा दुर्गम भागात असलेल्या बिलगाव येथील उदय नदीवर बारामुखी धबधबा आहे. हा धबधबा बाराधारा नावाने देखील ओळखला जातो.

7/7

अभिनेता शाहरुख खान याचा स्वदेश चित्रपट याच धबधब्यावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या प्रेरणेतून तयार करण्यात आला होता.