अडचणीत सापडलेल्या ७१ ट्रेकर्सची सुटका, भारतीय वायुसेनेची कामगिरी

लडाख : भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अनेक ट्रेकर्सचे प्राण वाचल्याचं समोर येतंय. लडाखमधल्या झंस्कार खोऱ्यातील निराक भागात भारतीय वायुसेनेनं अतिशय प्रतिकूल हवामानातही हे सर्च ऍन्ड रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. 

Jan 16, 2020, 16:32 PM IST

गेल्या दोन दिवसांमध्ये या ऑपरेशनमध्ये भारतीय वायुसेनेनं ALH हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं ७१ ट्रेकर्सची सुटका केलीय.

1/4

चादर ट्रेकसाठी आले होते ट्रेकर्स

चादर ट्रेकसाठी आले होते ट्रेकर्स

'चादर ट्रेक'साठी हे ट्रेकर्स या भागात पोहचले होते. परंतु, नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्यानं ट्रेकर्स इथं अडकून पडले. 

2/4

चादर ट्रेकसाठी आले होते ट्रेकर्स

चादर ट्रेकसाठी आले होते ट्रेकर्स

ही गोष्ट भारतीय वायुसेनेला समजल्यानंतर जवानांनी तातडीनं ट्रेकर्सना वाचवण्यासाठी सर्च ऑपरेशन हाती घेतलं.

3/4

चादर ट्रेकसाठी आले होते ट्रेकर्स

चादर ट्रेकसाठी आले होते ट्रेकर्स

सुटका करण्यात आलेल्या ७१ ट्रेकर्सना सुखरुप लेहला पोहचवण्यात आलंय. 

4/4

चादर ट्रेकसाठी आले होते ट्रेकर्स

चादर ट्रेकसाठी आले होते ट्रेकर्स

पेदुम भागात अजूनही ९ फ्रान्स आणि चीनचे नागरिक असलेले ट्रेकर्स फसलेले आहेत. त्यामुळे, हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचं समजतंय.