आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

May 03, 2020, 12:53 PM IST

1/8

आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

देशभरात Coronavirus कोरोना विषाणूशी सुरु असणारा लढा आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. शक्य त्या सर्व मार्गांनी कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारपासून विविध राज्यांमध्ये असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणाही कसोशीनं प्रयत्न करत आहेत. यामध्ये अविरतपणे सेवा देणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक सेवांमध्ये सेवेत असणारी मंडळी अशा प्रत्येकाप्रती आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने पुढाकार घेतला. रविवारी भारतीय लष्कर, वायुदल, नौदल, तटरक्षक दल अशा तुकड्यांकडून चॉपर, लढाऊ विमानं, सैन्याची भव्य मालवाहू विमानं यांच्या सहाय्याने देशभरातील कोरोना वॉरिअर्सचा सन्मान करण्यात आला.  उर अभिमानाने दाटून येईल अशाच क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी यावेळी देशवासियांना मिळाली. चला तर मग, पाहूया अशाच काही अभिमानास्पद प्रसंगांची क्षणचित्रं....   

2/8

आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

भारतीय वायुदलाच्या हॅलिक़ॉप्टरमधून मुंबईतील वायुदलाच्या INHS अश्विनी या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह इतरही रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

3/8

आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या आयएनएस जलश्वव या जहाजारुन कोरोना वॉरिअर्सना सलाम करण्यात आला. 

4/8

आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

शिलाँग येथे सिव्हिल रुग्णालयावरुन वायुदलाकडून फ्लायपास्ट करण्यात आलं.   

5/8

आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

भारतीय सैन्यातील तिन्ही सैन्यदल तुकड्यांच्या प्रमुखांनी राष्ट्रीय पोलीस स्मारकात मानवंदना दिली. 

6/8

आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

केरळमधील त्रिवेंद्रम वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयावर भारतीय वायुदलाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. (सौजन्य- Defence PRO Trivandrum)

7/8

आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

आसामच्या आसमंतात वायुदलाच्या Su-30MKI लढाऊ विमानाचा आवाज दुमदुमला. 

8/8

आभारी आहोत! कोरोनाच्या लढवैय्यांना थरारक सलाम

दिल्लीतील एम्स रुग्णालयावरही यावेळी वायुदलाच्या हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.  (सर्व छायाचित्रे- एएनआय)