SaluteCoronaWarriors : सैन्यदलाकडून कोरोना वॉरिअर्सना लक्षवेधी मानवंदना

May 03, 2020, 11:01 AM IST
1/7

SaluteCoronaWarriors : सैन्यदलाकडून कोरोना वॉरिअर्सना लक्षवेधी मानवंदना

कोरोना विषाणूशी सारा देश लढा देत असतानाच यामध्ये अविरत सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याप्रती सध्या सर्व स्तरांतून आभार व्यक्त केले जात आहेत. 

2/7

SaluteCoronaWarriors : सैन्यदलाकडून कोरोना वॉरिअर्सना लक्षवेधी मानवंदना

डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, सुरक्षा रक्षक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अशा सर्वांचाच सन्मान करण्यात आला..   

3/7

SaluteCoronaWarriors : सैन्यदलाकडून कोरोना वॉरिअर्सना लक्षवेधी मानवंदना

फक्त कोरोना रुग्णच नव्हे, तर सारा देश या कोविड योद्ध्यांच्या प्रयत्नांना आणि बहुमूल्य अशा योगदानाला सलाम केला गेला. 

4/7

SaluteCoronaWarriors : सैन्यदलाकडून कोरोना वॉरिअर्सना लक्षवेधी मानवंदना

भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही तुकड्यांनी म्हणजेच नौदल, वायुदल आणि लष्कराने या कोरोना वॉरिअर्सना डोळे दीपवणारी मानवंदना दिली. लष्कराच्या बँड पथकापासून, युद्धनौकांवरील रोषणाई आणि लढाऊ विमानांच्या फ्लायपास्टपर्यंत शक्य त्या सर्व पद्धतींनी ही मानवंदना देण्यात आली. 

5/7

SaluteCoronaWarriors : सैन्यदलाकडून कोरोना वॉरिअर्सना लक्षवेधी मानवंदना

मुंबई, दिल्ली, हरियाणा, लेह, नागपूर आणि देशातील विविध ठिकाणी असणाऱ्या रुग्णालयांवर सैन्यदलाच्या सेवेत असणाऱ्या हॅलिकॉप्टर्सच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. 

6/7

SaluteCoronaWarriors : सैन्यदलाकडून कोरोना वॉरिअर्सना लक्षवेधी मानवंदना

एक सन्मान आणि आदराची भावना व्यक्त करण्यासाठी मुंबईत सैन्यदलाच्या SU-30 या लढाऊ विमानाचा फ्लायपास्ट पाहण्याची संधी शहरवासियांना मिळाली. अर्थात या दृश्याचा अनुभव सर्वांनीच आपआपल्या घरांतूनच घेतला. 

7/7

SaluteCoronaWarriors : सैन्यदलाकडून कोरोना वॉरिअर्सना लक्षवेधी मानवंदना

दिल्लीतही राजपथावरुन वायुदलाचा फ्लायपास्ट झाला, जिथे कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णसेवा करणाऱ्यांपासून या युद्धात योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि इतरही प्रत्येक व्यक्तीचे सहृदय आभार मानत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. (सर्व छायाचित्रे- एएनआय)