ना लग्न, ना घटस्फोट! भारतामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोची का होतेय चर्चा?

 भारतीय खेळाडुंचे खासगी आयुष्य माध्यमांसमोर येत असताना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या रिलेशनशीपची चर्चा होतेय. 

| May 26, 2024, 11:06 AM IST

Cristiano Ronaldo Relationship: भारतीय खेळाडुंचे खासगी आयुष्य माध्यमांसमोर येत असताना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या रिलेशनशीपची चर्चा होतेय. 

1/9

ना लग्न, ना घटस्फोट! भारतामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोची का होतेय चर्चा?

Indian Cricketer Divorce Cristiano Ronaldo Relationship in trend

Cristiano Ronaldo Relationship: भारतीय क्रिकेटपट्टू दिनेश कार्तिक आणि निकित वंजारा, मोहमद शमी आणि हसिन जहा, शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या घटस्फोटांच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. सध्या हार्दिक पांड्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. भारतीय खेळाडुंचे खासगी आयुष्य माध्यमांसमोर येत असताना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या रिलेशनशीपची चर्चा होतेय. 

2/9

13 वर्षात 18 गर्लफ्रेण्ड, 5 मुले

इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ख्रिस्तियानो रोनाल्डोचे फोटो शेअर केले जात आहे. त्यावर ना लग्न, घटस्फोट, ना टेन्शन अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जात आहे. 13 वर्षात 18 गर्लफ्रेण्ड, 5 मुले तरीही सिंगल..अशीदेखील ख्रिस्तियानोची ओळख करुन दिली जात आहे. 

3/9

जॉर्जिना रॉड्रिग्ज

रोनाल्डो सौदी अरेबिया फुटबॉल लीगमध्ये अल-नासरकडून खेळत आहे. रोनाल्डोचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 रोजी मडेरा येथे झाला. ख्रिस्तियानो रोनाल्डोला लग्नाशिवाय पाच मुले आहेत. सध्या रोनाल्डो स्पॅनिश सुपरमॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोन्ही जोडपे 2017 पासून एकमेकांसोबत आहेत. पण याआधीही क्रिस्टियानो रोनाल्डोच्या अनेक गर्लफ्रेंड होत्या.

4/9

मार्चेना रोमेरो

ख्रिस्तियानो 5 वर्षांपासून एका टीव्ही प्रेजेंटरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 2005 मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव पोर्तुगीज मॉडेल आणि टीव्ही प्रेझेंटर मार्चेना रोमेरोसोबत जोडले गेले होते. रोनाल्डोने 2005 ते 2006 दरम्यान मार्चेला डेट केले. त्यावेळी दोघांचे अनेक फोटो समोर आले होते. मात्र दोघांनीही या नात्याला कधीही स्पष्टपणे दुजोराही दिला नाही किंवा नाकारले नाही.

5/9

नेरिडा गॅलार्डो

2007 मध्ये, अभिनेत्री मॉडेल रेडिओ होस्टसोबत क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव समोर आले. यानंतर, 2008 च्या सुरुवातीला रोनाल्डोने मॉडेल नेरिडा गॅलार्डोला डेट केले. या दोघांचे नातेही काही काळ टिकले. 

6/9

पॅरिस हिल्टन

2009 मध्ये रोनाल्डोने अभिनेत्री आणि मॉडेल पॅरिस हिल्टनला डेट केले.

7/9

किम कार्दशियन

रोनाल्डोने 2010 मध्ये किम कार्दशियनलाही डेट केले होते. 

8/9

इरिना शेक

रोनाल्डोने 2010 मध्ये रशियन मॉडेल इरिना शेकलाही डेट केले होते. त्यादरम्यान रोनाल्डो आणि इरिना कायमचे एकत्र राहतील असे म्हटले जात होते पण असे काहीही झाले नाही.

9/9

लुसिया विलान

यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव स्पॅनिश टीव्ही रिपोर्टर लुसिया विलानसोबत जोडले गेले. त्याने काही काळ रुसिया विलानलाही डेट केले होते. पण त्यांचे नातेही फार काळ टिकू शकले नाही.