इंडियन जुगाड! नाशिकच्या पोरानं शेतातचं बनवला मिनी ट्रॅक्टर

नाशिकच्या तरुणाचा भन्नाट जुगाड. बनवला मिनी ट्रॅक्टर. 

| Aug 03, 2024, 20:42 PM IST

Nashik Indian Jugad Tractor : भारतात टॅलेंटची कमी नाही. नाशिकमधील  पोरानं शेतातचं मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. टाकाऊ वस्तू पासून त्याने हा ट्र्रॅक्टर बनवला आहे.  

1/7

 शेतीसाठी काम करतांना येणा-या अडचणींवर मात करत तयार करत एका तरुण शेतक-याने केलेला टिकावू वस्तू पासून टिकाऊ मिनी ट्रॅकर बनवला आहे. 

2/7

शेती करतांना शेतक-यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यातच त्याच्या मालाला भाव मिळेल याची शाश्वती नसते. कमी खर्चात लागवडी पासून उत्पादन निघे पर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रविण याने सर्व अडचणींवर मात केली आहे. 

3/7

प्रविण याने वडिल शशिकांत कोल्हे यांच्या मार्गदर्शन घेतले आणि एक आगळ-वेगळ हाताने चालवणारे मिनी ट्रॅक्टर आपल्या कल्पनेतून साकार केला. त्याचा फायदा स्वताच्या शेतीसाठी करत आहे.

4/7

यातून शेतीची कोळपणी,नांगणी,सरी पाडणे,अशा विविध कामे करता येतात.   

5/7

घरी जून्या पडलेल्या वस्तू जमा करत त्याने अवघ्या दोन हजार रुपयात हा मिनी पावर ट्रिलर बनवला आहे.

6/7

 नाशिकच्या येवला तालूक्यातील हडप सावरगाव येथिल प्रविण कोल्हे या तरुण शेतकऱ्याने टाकावू वस्तू पासून मिनी ट्रॅक्टर मह्णेज छोटा पावर ट्रिलर बनवला आहे.

7/7

गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी याचे कौतुक केले आहे.  हा मिनी ट्रॅक्टरचा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.