Top 5 Indian Origin CEO : भारत बनतोय विश्वगुरु... जगातल्या 'या' बड्या कंपन्याचे सीईओ आहेत भारतीय

Top 5 Indian Origin CEO: भारतीय वंशाचे अनेक सीईओ आहेत जे परदेशी कंपन्यांमध्ये काम करत आहेत.  स्टारबक्सच्या नवीन सीईओसाठी (New CEO of Starbucks) भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नियुक्ती झाली आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून लक्ष्मण नरसिंहन हे स्टारबक्सचे नवीन सीईओ म्हणून काम सुरू करतील आणि हॉवर्ड शुल्ट्ज हे एप्रिल 2023 पर्यंत अंतरिम सीईओ म्हणून काम करतील. अनेक मोठ्या परदेशी कंपन्याचे सीईओ हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. कोण आहेत ते सीईओ ? आणि कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत ? जाणून घेऊयात...

Sep 03, 2022, 11:27 AM IST
1/5

Paras Agarwal - Twitter

पराग अग्रवाल यांनी इंजिनीअर म्हणून करिअरची सुरुवात ट्विटरमध्ये केली होती. सध्या ते ट्विटरचे सीईओ आहेत. पराग अग्रवालने 2001 साली तुर्की येथे झालेल्या International Physics Olympiad मध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याचं वार्षिक पॅकेज सुमारे 7.5 कोटी रुपये आहे.

2/5

Satya Nadella - Microsoft

सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे जगातील सर्वात लोकप्रिय सीईओ आहेत. याआधी ते क्लाउड आणि एंटरप्राइज ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. त्याचं वार्षिक पॅकेज सुमारे $42 Million म्हणजेच तब्बल 3084 कोटी रुपये आहे.

3/5

Sundar Pichai - Alphabet

सुंदर पिचाई हे Google आणि तिची मूळ कंपनी अल्फाबेटचे प्रमुख आहेत. पण त्यानी बोनस आणि स्टॉक ग्रोथमधूनही भरपूर कमाई केली आहे. सुंदर पिचाई यांना 2015 मध्ये गुगलचे सीईओ बनवण्यात आलं होतं. ते 2019 मध्ये Alphabet चे सीईओ बनले. सुंदर पिचाई यांच्या पगाराबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा मूळ पगार 2 मिलियन डॉलर (सुमारे 15 कोटी रुपये) आहे.

4/5

Arvind Krishna - IBM

Arvind Krishna यांनी IIT कानपूरमधून शिक्षण घेतलं आणि सध्या ते IBM चे अध्यक्ष आणि सीईओ (Chairman & CEO) आहेत. Arvind Krishna हे फेडरल बँक ऑफ न्यूयॉर्कच्या बोर्ड ऑफ डायरेक्टवर देखील आहेत.

5/5

Shantanu Narayen - Adobe

Adobe चे CEO म्हणून शंतनू नारायण हे कंपनीची जबाबदारी सांभाळत आहेत. 1998 मध्ये Adobe चा भाग होण्यापूर्वी, नारायण यांनी 1986 मध्ये सिलिकॉन व्हॅली स्टार्ट-अप Majorx Automation Systems मध्ये काम केलंय. यानंतर त्यांनी 1989 ते 1995 पर्यंत ऍपलसाठी देखील काम केलं.