कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, 312 गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय

| Aug 26, 2023, 17:11 PM IST
1/8

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, 312 गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय

Indian Railway 312 Ganpati Special Train for mumbai Maharashtra Region

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना अजून रेल्वेचे कन्फर्म तिकीट न मिळाल्याने टेन्शन आलंय. पण आता रेल्वेने त्यांच्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे. 

2/8

प्रवाशांच्या सोयीसाठी

Indian Railway 312 Ganpati Special Train for mumbai Maharashtra Region

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे 'गणपती स्पेशल ट्रेन' चालवणार आहे. 

3/8

गणपती उत्सवापूर्वी 312 गाड्या

Indian Railway 312 Ganpati Special Train for mumbai Maharashtra Region

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मिळून गणपती उत्सवापूर्वी 312 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याबाबत चर्चा केली आहे. यादरम्यान मध्य रेल्वेतर्फे 257 गणपती विशेष गाड्या आणि पश्चिम रेल्वेतर्फे 55 गाड्या चालवण्यात येणार आहेत.

4/8

गणपती स्पेशल ट्रेन

Indian Railway 312 Ganpati Special Train for mumbai Maharashtra Region

या गाड्या मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकांतून चालवल्या जातील. भाविकांना वाहतुकीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यावर्षी रेल्वेने 312 'गणपती स्पेशल ट्रेन' चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

5/8

18 गाड्या जास्त

Indian Railway 312 Ganpati Special Train for mumbai Maharashtra Region

2022 मध्ये या मार्गावरुन एकूण 294 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर यंदा त्यापेक्षा 18 गाड्या जास्त आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. 

6/8

यावेळी 218 राखीव सेवा

Indian Railway 312 Ganpati Special Train for mumbai Maharashtra Region

साधारणत: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची वर्दळ असते. मुंबईला इतर राज्यांशी जोडणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या जास्त आहे.  

7/8

अनारक्षित गाड्या

Indian Railway 312 Ganpati Special Train for mumbai Maharashtra Region

यावर्षी 94 अनारक्षित गाड्या असतील तर गेल्या वर्षी त्यांची एकूण संख्या केवळ 32 होती.  

8/8

5.13 कोटी रुपयांचा महसूल

Indian Railway 312 Ganpati Special Train for mumbai Maharashtra Region

यंदा 19 सप्टेंबर रोजी देशभरात गणेश चतुर्थी हा सण साजरा होईल. मध्य रेल्वेने केलेल्या अंदाजानुसार, यावर्षी सुमारे 1 लाख 4 हजार प्रवासी आरक्षित गाड्यांमधून प्रवास करतील. यातून 5 कोटी 13 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.