IRCTC अलर्ट! तिकीट कॅन्सल करताना चुकूनही करु नका 'या' गोष्टी

रेल्वे तिकीट रद्द करत असाल तर सावध राहा. कारण, तिकीट रद्द करताना तुमचं अकाऊंट कदाचित खाली होऊ शकतं. सायबर क्राईममुळे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. 

Mar 04, 2020, 16:59 PM IST

आयआरसीटीसीने, नुकतंच प्रवाशांना ऑनलाईन फसवणूकीपासून वाचण्यासाठी अलर्ट जाहीर केला आहे. IRCTCने त्यांच्याकडून कधीही फोन किंवा मेसेजवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक, बँकसंबंधी माहिती मागितली जात नसल्याचं सांगितलं आहे.

1/5

IRCTCने ट्विट करत, प्रवाशांनी त्यांची खासगी माहिती, फोन नंबर, सोशल मीडियाही कोणाशीही शेअर न करण्याबाबत सांगितलं आहे. भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी केवळ अधिकृत लिंकवरच प्रवाशांची माहिती मागत असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय आयआरसीटीसी रिफंड  प्रोसेससाठी कोणत्याही ग्राहकाला मेसेज पाठवत नसल्याचं IRCTCने म्हटलंय.

2/5

आयआरसीटीसीने, ते ग्राहकांकडे कोणत्याही प्रकारच्या बँक खात्याबाबत माहिती मागत नसल्याचं सांगितलं. जर कोणी बँक खात्यासंबंधी माहिती मागत असल्यास हा फसवणूकीचा प्रकार असू शकतो.

3/5

ग्राहकांनी कोणत्याही परिस्थितीत आपला बँक अकाऊंट नंबर, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ट, एटीएम किंवा सीव्हीव्ही नंबर शेअर न करण्याचा सल्ला IRCTCने दिला आहे. सायबर क्राईमने अशाप्रकारचे डिटेल्स शेअर केल्यास ग्राहकांचं खातं खाली होण्याची शक्यता आहे.  

4/5

अशाप्रकारच्या फसवणूकीपासून वाचण्यासाठी काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर, रिफंड प्रोसेस पूर्णपणे ऑटोमॅटिक होते. रिफंडचे पैसे ग्राहकाच्या खात्यात जमा होतात. रिफंड करण्यासाठी रेल्वेकडून, बँक खात्याचा किंवा क्रेडिट कार्ड, सीव्हीव्हीचा नंबर मागितला जात नाही.

5/5

तिकीट रद्द केल्यानंतर, तिकीट चार्जेस कापून उरलेली रक्कम खात्यात जमा होते. तिकीट कॅन्सेलेशनबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करु नका. त्याशिवाय IRCTCसंबंधी कोणतीही माहिती गुगल किंवा इतर ठिकाणी सर्च करताना सावध राहा. रिफंड करण्याबाबत कोणताही फोन आल्यास सावध व्हा आणि कोणतीही माहिती फोनवरुन शेअर करु नका.