गणपतीला गावी जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट कधीपासून मिळणार? जाणून घ्या नियम

गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकीट कधी मिळणार? किती दिवस आधी आपल्याला ट्रेनचं तिकीट काढता येतं? रेल्वेचा नियम काय सांगतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

| Mar 30, 2024, 16:17 PM IST

Ganapati Festival train ticket: गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकीट कधी मिळणार? किती दिवस आधी आपल्याला ट्रेनचं तिकीट काढता येतं? रेल्वेचा नियम काय सांगतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1/8

गणपतीला गावी जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट कधी मिळणार? जाणून घ्या नियम

Indian Railway When will get Ganapati Festival train ticket advance booking Rules

शिमगा, होळीचा सण गेल्यावर कोकणी माणसाला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. गणेशोत्सवाला सुट्टी मिळावी यासाठी अनेकजण एवढ्यापासूनच आपल्या ऑफिसमध्ये माहिती देऊन ठेवतात. 

2/8

किती दिवस आधी तिकीट?

Indian Railway When will get Ganapati Festival train ticket advance booking Rules

तसेच ट्रेनची तिकीट कधी मिळणार? याची लगबग सुरु होते. किती दिवस आधी आपल्याला ट्रेनचं तिकीट काढता येतं? रेल्वेचा नियम काय सांगतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

3/8

ऑनलाईन तिकीट बुकींग

Indian Railway When will get Ganapati Festival train ticket advance booking Rules

प्रवशांना ट्रेन तिकीट बुकींगसाठी रेल्वे स्थानकांवर फेऱ्या माराव्या लागतात. अन्यथा एजंटसोबत बोलणी करावी लागते. पण तुम्हाला एवढी दगदग करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तिकीट बुकींग करु शकता. प्रवासाच्या किती दिवस आधी तुम्ही बुकींग करु शकता, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

4/8

रेल्वेच्या नियमांची माहिती

Indian Railway When will get Ganapati Festival train ticket advance booking Rules

ज्या प्रवाशांना नियमांची माहिती असते. ते लगेच आपलं तिकीट काढतात. त्यांना पुढचा त्रास होत नाही. त्यामुळे आपल्याला रेल्वेच्या नियमांची माहिती असायला हवी.

5/8

तारखेच्या 120 दिवस आधी

Indian Railway When will get Ganapati Festival train ticket advance booking Rules

प्रत्येक श्रेणीचे तिकीट, सुविधा, भाडे आणि तिकीट बुकींगचा नियम वेगवेगळा आहे. या नियमांची माहिती प्रत्येक प्रवाशाला असायला हवी.ट्रेनच्या तारखेच्या 120 दिवस आधी तुम्हाला तिकीट बुकींग करता येते. 

6/8

ट्रेन तिकीट बुकींगचा नियम

Indian Railway When will get Ganapati Festival train ticket advance booking Rules

भारतीय रेल्वेकडून प्रवासाच्या 120 दिवस आधी तिकीट बुकींगची व्यवस्था केली आहे. यामुळे तुम्हाला आरामात कन्फर्म तिकीट मिळू शकेल. तत्काल तिकीट बुकींगसाठी तुम्हाला प्रवासाच्या 1 दिवस आधी तिकीट मिळू शकते. एमर्जन्सीमध्ये कधी अचानक प्रवास करावा लागला तर हे लक्षात ठेवायला हवे. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. त्याच्या 120 दिवस आधी म्हणजे 10 मे रोजी तिकीट बुकींग सुरु होईल.

7/8

10 वाजता थर्ड एसी

Indian Railway When will get Ganapati Festival train ticket advance booking Rules

दररोज सकाळी 10 वाजता थर्ड एसी आणि त्यावरच्या श्रेणीची तिकीट बुकींग सुरु होते. स्लीपर तत्काल तिकीट बुकींग सकाळी 11 वाजता सुरु होते. यूटीएस अॅपवरुन अनारक्षित रेल्वे तिकीट बुकींग प्रवासाच्या दिवशी करता येते.

8/8

जनरल तिकीटसाठी वेगळे नियम

Indian Railway When will get Ganapati Festival train ticket advance booking Rules

199 किलोमीटरपर्यंत कोणत्या ट्रेनने जनरल डब्ब्यातून प्रवास करत असाल तर त्याच दिवशी तुम्हाला तिकीट खरेदी करावे लागेल. 199 किलोमीटरपर्यंत घेतलेली रेल्वे तिकीट 3 तासांसाठी असते. त्यामुळे तिकीट घेतल्याचा 3 तासात ट्रेन पकडावी लागते. 200 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर असेल तर 3 दिवस आधी जनरल तिकीट घेतले जाते.