न्यूझीलंडमध्ये या ४ दिग्गजांनी ठोकलंय शतक

| Jan 21, 2019, 13:54 PM IST
1/7

४ दिग्गाजांचं शतक

४ दिग्गाजांचं शतक

न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाच्या केवळ ४ खेळाडूंनी शतक ठोकले आहेत. ज्यामध्ये विराट कोहली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे.

2/7

सेहवागचे सर्वाधिक शतक

सेहवागचे सर्वाधिक शतक

सेहवागने न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक 3 वनडे शतक ठोकले आहेत. सेहवागने हे दोन शतक 2002-03 च्या सिरीजमध्ये ठोकले होते.तर तिसरं शतक 2009 मध्ये हेमिलटनमध्ये केलं होतं. सेहवागने 29 डिसेंबर 2002 मध्ये न्यूझीलंडमध्ये पहिलं शतक ठोकलं होतं. यानंतरच्या सामन्यात टीम इंडियाचा 35 रनने पराभव झाला होता. 11 जानेवारी 2003 ला ऑकलँड वनडेमध्ये विरूच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने एक विकेटने विजय मिळवला होता. 2009 मध्ये पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि भारताने 84 रनने हा सामना जिंकला होता.

3/7

सचिनची वनडेमधील सर्वात मोठी खेळी

सचिनची वनडेमधील सर्वात मोठी खेळी

सेहवागच्या शिवाय टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने देखील न्यूझीलंडमध्ये शतक ठोकलं होतं. सचिनने 2009 मध्ये क्राइस्टचर्चमध्ये शानदार 163 रनची खेळी केली होती. रिटायर्ड हर्ट झाल्याने त्याला माघारी जावं लागलं होतं. या इनिंगमध्ये टीम इंडियाने 392 रनचं मोठं आव्हान उभं केलं ज्यामध्ये न्यूझीलंडचा 58 रनने पराभव झाला होता. सचिन यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता.

4/7

द्रविडने ठोकलं होतं पहिलं शतक

द्रविडने ठोकलं होतं पहिलं शतक

राहुल द्रविडने न्यूझीलंडमध्ये टीम इंडियासाठी पहिलं शतक ठोकलं होतं. द्रविडने 1999 मध्ये न्यूझीलंडच्या टॉपोमध्ये 123 रनची नाबाद खेळी केली होती. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताचा ५ विकेटने पराभव झाला होता.

5/7

विराटने ठोकलं होतं शतक

विराटने ठोकलं होतं शतक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 2014 मध्ये नेपियर वनडेमध्ये 123 रनची खेळी केली होती. यानंतर ही टीम इंडियाला 24 रनने पराभवाचा सामना करावा लागला होता. विराट कोहली सध्या चांगली कामगिरी करतो आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने वनडे सिरीजमध्ये शानदार शतक ठोकलं. विराटने मागील वर्षी टेस्ट सामन्यांमध्ये देखील शानदार कामगिरी केली होती.

6/7

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा

न्यूझीलंडमध्ये भारत 5 वनडे, तीन टी-20 सामने खेळणार आहे. दोन्ही टीममध्ये पहिला वनडे सामना 23 जानेवारीला होणार आहे. या सिरीजनंतर टीम इंडिया 6 फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान 3 टी-20 सामने खेळणार आहे. भारताने न्यूझीलंड विरोधात आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये फक्त 10 सामने भारताने जिंकले आहेत. न्यूझीलंडने यापैकी 21 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने ड्रॉ झाले आहेत.

7/7

न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड

न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंत 13 वेळा वनडे सिरीज झाली आहे. यामध्ये न्यूजीलंडमध्ये 7 वनडे सिरीज झाल्या आहेत. यापैकी न्यूझीलंडने चार सिरीज जिंकली आहे. तर 2 ड्रॉ ठरल्या आहेत. टीम इंडियाने तीन सिरीज जिंकल्या आहेत. भारताने न्यूझीलंडला त्यांचाच घरात फक्त एकाच वनडे सिरीजमध्ये पराभूत केलं आहे. भारतीय टीमने ही सिरीज 2009 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात खेळली आहे.