अवघ्या 4 महिन्यांच्या मुलाला नारायण मूर्तींनी दिले 240 कोटी रुपयांचे शेअर

Infysos Narayan Murthy : 4 महिन्यांचा हा मुलगा आहे तरी कोण? त्याच्या नावे नारायण मूर्तींनी का दिले इतक्या किमतीचे शेअर? 

Mar 19, 2024, 12:08 PM IST

Infysos च्या सहसंस्थापकपदी असणारे नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी, सुधा मूर्ती कायमच चर्चांच्या केंद्रस्थानी असतात. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेल्या संस्थेची धुरा सांभाळण्यापासून मूर्ती यांनी कायमच त्यांच्या साधेपणानं सर्वांची मनं जिंकली. 

1/7

Infysos Narayan Murthy

Infosys Narayana Murthy gifts company shares worth Rs 240 crore to 4 month old grandson business news

Infysos Narayan Murthy : एखाद्या व्यक्तीला छानशी भेट द्यायचं झालं, की नेमकं काय भेट द्यायची इथपासून त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी काय, दिलेल्या भेटीचा त्याला वापर किती होईल हे असे प्रश्न उपस्थित होतात. भेट देण्याच्या बाबतीत काही मंडळी मात्र इतका चौकटीबाहेरचा विचार करतात की, त्यांच्या बुद्धिचातुर्याचं कौतुक करावं तितकं कमी. 

2/7

हा मुलगा कोण माहितीये?

Infosys Narayana Murthy gifts company shares worth Rs 240 crore to 4 month old grandson business news

सध्या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी अवघ्याच चार वर्षांच्या मुलाला अशी भेट दिली आहे, की वर्षभर ही भेट त्याच्याही लक्षात राहील. मूर्ती यांनी या चिमुकल्याच्या नावे एकदोन नव्हे, तब्बल 240 कोटी रुपयांचे शेअर केले आहेत. हा मुलगा कोण माहितीये? 

3/7

एका क्षणात कोट्यधीशांच्या यादीत पोहोचला

Infosys Narayana Murthy gifts company shares worth Rs 240 crore to 4 month old grandson business news

हा चिमुकला म्हणजे नारायण मूर्ती यांचा नातू. रोहन मूर्ती या आपल्या मुलाच्या लेकाला नारायण मूर्ती यांनी हे शेअर दिले ज्यामुळं तो एका क्षणात कोट्यधीशांच्या यादीत पोहोचला. सूत्रांच्या माहितीनुसार या व्यवहाराची एक्सचेंज फायलिंग समोर आली आहे. 

4/7

इन्फोसिसचे 15 लाख शेअर

Infosys Narayana Murthy gifts company shares worth Rs 240 crore to 4 month old grandson business news

एकाग्रकडे (नारायण मूर्ती यांचा नातू) इन्फोसिसचे 15 लाख शेअर असून, त्याच्या नावे कंपनीची 0.04 टक्के भागिरादीसुद्धा आहे. हा संपूर्ण व्यवहार ऑफ मार्केट झाल्याचं इथं लक्षात येत आहे.   

5/7

नारायण मूर्ती यांचा नातू

Infosys Narayana Murthy gifts company shares worth Rs 240 crore to 4 month old grandson business news

नोव्हेंबर 2023 मध्ये रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन यांच्या घरी एकाग्रचा जन्म झाला होता. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा हा तिसरा नातू. 

6/7

कंपनीची भागिदारी

Infosys Narayana Murthy gifts company shares worth Rs 240 crore to 4 month old grandson business news

नातवाला भेट स्वरुपात 0.04 टक्के शेअर दिल्यानंतर आता नारायण मूर्ती यांच्याकडे कंपनीच्या 0.40 टक्के भागिदारीपैकी 0.36 टक्के भागिदारी उरली आहे. 

7/7

नारायण मूर्ती यांचं कुटुंब

Infosys Narayana Murthy gifts company shares worth Rs 240 crore to 4 month old grandson business news

एकाग्र हा नारायण मूर्ती यांच्या मुलाचा मुलगा. तर, त्यांची मुलगी अक्षता मूर्ती आणि जावई ऋषी सुनक यांनाही दोन मुली आहेत. कृष्णा सुनक, अनुष्का सुनक अशी त्या दोन्ही मुलींची नावं आहेत.