IPL 2023 : फक्त 10 सेकंदाची झलक अन्... गुजरातच्या सामन्यात दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामात केवळ खेळाडूंचीच नाही तर सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांचीही जोरदार चर्चा होते. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या 39 व्या सामन्यात गुजरात टायटन्सला सपोर्ट करत प्रेक्षकांमध्ये बसलेली एक मिस्ट्री गर्लही समोर आली होती. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे संघ मैदानावर भिडत असताना कॅमेरामनची नजर या मिस्ट्री गर्लवर पडली होती.

May 06, 2023, 17:29 PM IST
1/7

sahiba sherni mystery girl

ही मिस्ट्री गर्ल कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र आता याची माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊ या व्हायरल फोटोतील ही मुलगी कोण आहे जिच्या व्हायरल फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य - sahibasherni/instagram)  

2/7

sahiba sherni IPL

या सामन्यादरम्यान पिवळ्या रंगाचा टॉप घातलेली एक मुलगी कॅमेऱ्यात कैद झाली होती. ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून एक इन्स्टा मॉडेल आहे, जिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे नाव साहिबा शेरनी लिहिले आहे.

3/7

sahiba sherni education

शीख कुटुंबातील साहिबा कौरचा जन्म 13 मे 1990 रोजी हरियाणातील गुडगाव येथे झाला. साहिबाला देविंदर सिंग सेठी आणि गुरविंदर कौर सेठी यांनी तिला तिची धाकटी बहीण आशीत कौर यांच्यासोबत वाढवले. साहिबाने नवी दिल्ली येथे आपले शिक्षण पूर्ण केले.

4/7

sahiba sherni fashion studio

साहिबाने दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि आता तिची आई गुरविंदर कौर यांच्यासोबत डिझाइन स्टुडिओची सह-मालक आहे. साहिबा त्यांच्या WOW डिझाईन स्टुडिओ मॅन अँड वुमन या स्टुडिओद्वारे आकर्षक डिझाइन्स तयार करण्याचा प्रयत्न करते.

5/7

sahiba sherni instagram followers

साहिबा शेरनीने इंस्टाग्रामवर 1 लाख 38 हजार फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर साहिबा इन्स्टाग्रामवर तिच्या फोटो आणि टॅटूसाठीही प्रसिद्ध आहे.

6/7

sahiba sherni mtv roadies

साहिबा ही फॅशन डिझायनर देखील आहे. तसेच, ती पंजाबच्या मोहालीची रहिवासी आहे. साहिबा लोकप्रिय एमटीव्ही रोडीज रिअल हिरो या शोचा देखील भाग होती. 

7/7

sahiba sherni tattoo

साहिबाला टॅटूची आवड आहे. तिने आपल्या शरीरावर अनेक टॅटू काढले आहेत. तसेच 'पंजाब' हे पंजाबी भाषेतही लिहिलेले आहे.