Kitchen Hacks: लसणाची पेस्ट ते बटाटे शिजवण्यापर्यंत असाही करा मायक्रोवेव्हचा वापर

Cooking Tips : जेवण गरम करण्यापेक्षा इतर बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. जे आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकलं नसेल आणि वाचलेही नसतील 

Jan 30, 2023, 18:48 PM IST

Microwave Cooking Hacks:आजकाल आपल्या किचनमध्ये अनेक आधुनिक गोष्टींचा समावेश होतो. मायक्रोव्हेव तर प्रत्येक किचनमध्ये हल्ली दिसू लागला आहे. एखादा पदार्थ पटकन गरम करण्यासाठी मायक्रोव्हेवचा उपयोग केला जातो. त्याचसोबत केक, पिझ्झा इतर पदार्थसुद्धा ओव्हनमध्ये केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्तसुद्धा मायक्रोव्हेवचा उपयोग आपण रोजच्या वापरात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया मायक्रोवेव्हचे असेच काही इंटरेस्टिंग फायदे. 

1/4

Cooking Tips How to used Microwave Oven for making garlic paste and more kitchen hacks marathi

लसणाला मधोमध काप एका वाटीत ठेऊन द्या आणि त्या वाटीत वरून ऑलिव्ह ऑइल घाला. काही वेळ ओव्हनमध्ये गरम करा पाकळ्या आपोपाप निसटतील, मग चमच्याने स्मॅश करा लसुण पेस्ट तयार. 

2/4

Cooking Tips How to used Microwave Oven for making garlic paste and more kitchen hacks marathi

लिंबू धुवून सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन द्या, ,मग ते वापरा लिंबू मऊ होईल आणि त्यातून जास्त रस निघेल.

3/4

Cooking Tips How to used Microwave Oven for making garlic paste and more kitchen hacks marathi

अर्धा बाउल पाणी घ्या. त्यात बटाटे टाका आणि आणि 8 मिनिटांचा टायमर लावून ठेऊन द्या.अगदी परफेक्ट बटाटे शिजवू शकता.

4/4

Cooking Tips How to used Microwave Oven for making garlic paste and more kitchen hacks marathi

बाऊलमध्ये तूर मुगाची डाळ घ्या त्यात आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, हळद घाला. आणि 20 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन द्या, व्यवस्थित डाळ शिजून तयार.