Diabetes: गोड खायचयं पण मधुमेह आहे? 'या' पानांचा रस प्या आणि तुमची साखर नियंत्रणात आणा!

Benefits Of Aloe Vera Juice: एखाद्याला मधुमेह झाला की माणसावर अनेक बंधन येतात. जसे की खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. पहिले तर गोड पदार्थांवर बंधन येतात. पण या आजारावर आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचा मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.  

Jan 30, 2023, 16:41 PM IST
1/5

मधुमेहाचे प्रकार

आपल्या शरीरात दोन प्रकारचा मधुमेह अढळतो. यामध्ये टाईप-1 आणि टाईप-2, यामधील टाईप-1 च्या रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे या व्यक्तीस आपण बाहेरुन इन्सुलिन देऊ शकतो. या व्यक्तींना आयुष्यभर या आजारासोबत जागवे लागते. तर टाईप 2 च्या रुग्णांना कमी प्रमाणात मधुमेह असतो.

2/5

या आजारावर असे करा उपाय

कोरफडीचे साल घेऊन त्यातून जेल काढा. त्यानंतर ते चांगले मिस्क करून घ्या. त्यामध्ये काळे मीठ, लिंबू आणि काळी मिरी मिसळून रस तयार करा आणि प्या. हा रस नियमितपणे प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतील. 

3/5

एलोवेरा ज्यूस हा मधुमेह आणि प्री-मधुमेहाचे रुग्ण पिऊ शकतात. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. पण रस पिण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्या घेणे गरजेचे आहे.  

4/5

मधुमेहाच्या रुग्ण म्हटलं की त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी कोरफडीचा रस अवश्य सेवन करणे गरजेचे आहे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घातक आजारांपासून संरक्षण करतात. 

5/5

मधुमेही रुग्णांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. कोरफडीचा रस नियमित सेवन केल्यास अॅसिडिटी, अपचन यासारख्या समस्या दूर होतात.