Investment Tips: पैसे कमावण्यासाठी गुंतवणुकीचे 'हे' चार पर्याय सर्वोत्तम, पैशांचा पाऊस पडेल

Investment Tips: पैसे कमावण्यासाठी गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करुन त्यातून चांगले पैसे मिळवू शकता. अशाच काही गुंतवणुकींबद्दल जाणून घ्या, ज्याच्या माध्यमातून तुम्ही चांगलं रिटर्न मिळवू शकता.   

Mar 02, 2023, 18:22 PM IST
1/5

Saving: जर तुम्हाला आपण कमावलेला पैसा गुंतवायचा असेल तर त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवून त्यातून चांगली कमाई करु शकता. अशाच काही गुंतवणुंकीबद्दल आज जाणून घेऊयात.   

2/5

सोनं -  सोन्यात गुंतवणूक करणं फार फायद्याचं आहे. भविष्याबद्दल विचार कराला गेल्यास सोनं ही फायद्याची आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. सोन्याचा वाढता दर पाहता भविष्यात त्यातून आपल्याला फार नफा मिळतो.   

3/5

निश्चित व्याज - बँकेत ठेवलेल्या पैशांमधून मिळणाऱ्या व्याजावरही तुम्ही अनेक खर्च करु शकता. निश्चित व्याज देणाऱ्या बॉन्ड किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं असतं.   

4/5

स्थायी संपत्ती -  तुम्ही स्थायी संपत्तीतही गुंतवणूक करु शकता. घर किंवा जमिनीच्या किंमती या भविष्यात वाढत जातात. अशामध्ये तुमच्याकडे दीर्घ काळासाठी एखादी संपत्ती असेल तर त्यातून नफा मिळण्याची शक्यता असते. यामध्ये तुम्ही प्रत्यक्षपणे गुंतवणूक करु शकता.   

5/5

शेअर्स -  शेअर्समधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठीची गुंतवणूक असते. कोणत्याही कंपनीचे शेअर केल्यानंतर दीर्घकाळापर्यंत त्याच्या मूल्या वाढ होण्याची शक्यता असते. शेअर्सच्या वाढत्या किंमतीतून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. या किंमतींमध्ये चढ उतार होत असतो.