Home Loan EMI : 'या' बँक देताय सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
Home Loan EMI : तुमचं हक्काचं घर व्हावं म्हणून सध्या अनेक बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या (Housing Finance Company) 75 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 20 वर्षांच्या कालावधीसह 8 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदर देत आहेत. चला तर मग या बद्दल जाणून घेऊयात...
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) मे आणि जूनमध्ये दोनदा रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर गृहकर्जाच्या व्याजदरात चांगली वाढ झाली आहे. 0.90 टक्क्यांच्या वाढीनंतर रेपो दर 4.9 टक्के झाला आहे. आकडेवारीनुसार, सध्या अनेक बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या 75 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 20 वर्षांच्या कालावधीसह 8 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदर देत आहेत.