मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रहाणेची भावनिक पोस्ट

Oct 04, 2020, 15:22 PM IST
1/7

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रहाणेची भावनिक पोस्ट

क्रिकेटच्या मैदानात रमणाऱ्या क्रिकेटर अजिंक्य रहाणे यानं कायमच त्याच्या अनोख्या आणि तितक्याच मनमिळाऊ स्वभावानंही अनेकांची मनं जिंकली आहेत. संयमी खेळीसाठी ओळखला जाणारा हाच अजिंक्य सध्या भलताच आनंदात आहे. 

2/7

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रहाणेची भावनिक पोस्ट

त्याच्या आनंदाचं कारणही तसंच आहे. कारण, अजिंक्यची लाडकी लेक, त्याच्या आणि पत्नीच्या आयुष्यातील ही इवलीशी परी एक वर्षाची झाली आहे. 

3/7

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रहाणेची भावनिक पोस्ट

मुलीच्या म्हणजेच आर्याच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट लिहित अतिशय मोजक्या, पण तितक्याच सुरेख शब्दांत त्यानं हा आनंद व्यक्त केला आहे. 

4/7

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रहाणेची भावनिक पोस्ट

'...आणि अगदी सहजच ही इवलीशी परी एक वर्षाची झाली. तुझा बाबा असण्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट मला अधिक प्रिय नाही. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा', असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं. 

5/7

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रहाणेची भावनिक पोस्ट

आपल्या मुलीच्या नजरेतून हे जग पाहण्याचा आनंदही त्यानं आर्यासोबतचे काही फोटो पोस्ट करत व्यक्त केला. 

6/7

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रहाणेची भावनिक पोस्ट

मुख्य म्हणजे अजिंक्यनं यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबासमवेतचे फोटोही पोस्ट केले.   

7/7

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रहाणेची भावनिक पोस्ट

(सर्व छायाचित्रे- अजिंक्य रहाणे / फेसबुक)