IPL 2020 : विजेत्या मुंबईसह, उपविजेत्या दिल्लीला मिळाली किती रक्कम?

Nov 11, 2020, 07:01 AM IST
1/6

विजेत्या मुंबईसह, उपविजेत्या दिल्लीला मिळाली किती रक्कम?

IPL 2020च्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीवर ५ गडी राखून विजय विजय मिळवला. महत्त्वाचं म्हणजे मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून विजय मिळवला. विजेत्या मुंबईच्या संघाला २० कोटी रुपये इतकी बक्षिसपात्र रक्कम मिळाली.   

2/6

उपविजेतेद...

आयपीएलच्या १३ व्या हंगामात मुंबईकडून हार पत्करावी लागलेल्या दिल्लीच्या संघाला या स्पर्धेचं उपविजेतेपद आणि बक्षिस स्वरुपात १२ कोटी रुपये मिळाले.   

3/6

ऑरेंज कॅप...

पंजाबच्या संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या के.एल. राहुल यानं या हंगामात दमदार कामगिरी करत १४ सामन्यांत ६७० धावा केल्या. ज्यामध्ये त्यानं १ शतकी आणि ५ अर्धशतकी खेळी केल्याचं पाहायला मिळालं. ज्यासाठी त्याला ऑरेंज कॅप आणि १० लाख रुपये देऊन गौरवण्यात आलं.   

4/6

पर्पल कॅप...

दिल्लीच्या संघातील वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा यानं १७ सामन्यांमध्ये सर्वाधिक ३० गडी बाद करण्याची कमाल केली. ज्यामुळं त्याला पर्पल कॅप आणि १० लाख रुपये देऊन गौरवण्यात आलं. 

5/6

इमर्जिंग प्लेयर ऑफ टूर्नामेंट ...

बंगळुरू संघातील सलामीचा फलंदाज देवदत्त पडिक्कल यानंही यंदाचा हंगाम गाजवला. १५ सामन्यांमध्ये ५ वेळा अर्धशतकी खेळी करत त्यानं ४७३ धावा केल्या. ज्यासाठी त्याला इमर्जिंग प्लेयर ऑफ टूर्नामेंट या पुरस्कारासह १० लाख रुपयांनी गौरवण्यात आलं. 

6/6

मोस्ट वॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन ....

राजस्थान संघातील खेळाडू जोफ्रा आर्चर यानं १४ सामन्यांमध्ये २० गडी बाद करण्याची किमया केली. त्यानं ३०५ एमवीपी अंक मिळवले. ज्यासाठी त्याला मोस्ट वॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन या पुरस्कारासह १० लाख रुपये देत गौरवण्यात आलं.