बॅट्समनऐवजी 'यांच्या'वर संतापला Rohit Sharma! Playoffs बद्दल म्हणाला, "मला माहित नाही की..."

Rohit Sharma On MI Loses To LSG And Playoff: एक दोन नाही तर तब्बल 5 वेळा इंडियन प्रमिअर लिगची स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक असतानाच मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सने त्यांना पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे मुंबईची प्लेऑफ्समधील वाटचाल बिकट झाली आहे. या पराभवामुळे मुंबई तिसऱ्यावरुन चौथ्या स्थानावर सरकली आहे. अगदी हाताशी आलेला विजय मुंबईच्या हातून लखनऊने हिरवून घेतल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने संताप व्यक्त केला आहे. शेवटच्या 3 ओव्हरमधील संघाच्या कामगिरीवरुन रोहितने नाराजी व्यक्त केली. रोहितने या सामन्यानंतर नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...

May 17, 2023, 12:17 PM IST
1/11

मुंबई इंडियन्सचा  (Mumbai Indians) संघ विजयाच्या फार जवळ पोहचूनही अगदी शेवटच्या षटकामध्ये पराभूत झाला. मोहसीन खानने मुंबईच्या तोंडून विजयाचा खास हिरावून घेतला. या अनपेक्षित पराभवामुळे प्लेऑफ्समध्ये क्वालिफाय होण्याच्या मुंबईच्या इराद्यांना धक्का बसला आहे. 

2/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी 11 धावांची गरज होती. मात्र मुंबईच्या फलंदाजांना केवळ 5 धावाच करता आल्या. मुंबईला 5 बाद 172 धावांपर्यंत मजल मारता आली आणि लखनऊनने सामना 5 धावांनी जिंकला. हा मुंबईचा यंदाच्या पर्वातील 6 वा पराभव ठरला.

3/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

सामना पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माने पराभवासंदर्भात भाष्य करताना फलंदाजांऐवजी गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये जास्त धावा देणं आम्हाला महागात पडलं, असं रोहित म्हणाला. आम्ही चांगला खेळ केला नाही. काही असे क्षण होते की जिथे आम्ही आघाडी घ्यायला हवी होती, मात्र असं काही आम्हाला करता आलं नाही, असं रोहित म्हणाला.

4/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

आजचा दिवस आमच्यासाठी चांगला नव्हता. मात्र आम्ही सकारात्मक विचार केला पाहिजे आणि मनोबल सकारात्मक ठेवलं पाहिजे, असंही रोहितने म्हटलं.

5/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

मुंबईच्या गोलंदाजांची पिसं लखनऊनच्या फलंदाजांनी काढली. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये मुंबईने तब्बल 54 धावा दिल्या. मार्कस स्टॉनिसने तुफान फटकेबाजी करत षटकारांचा पाऊस पाडला. 8 षटकारांच्या मदीतने त्याने 47 चेंडूंमध्ये नाबाद 89 धावा केल्या.

6/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

आम्हाला खेळपट्टी कशी आहे याची कल्पना आली होती. खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती. आम्ही सामन्याच्या पहिल्या डावातील उत्तारार्धामध्ये सामन्यावरील पकड गमावली. शेवटच्या 3 षटकांमध्ये आमच्या फलंदाजांनी फार धावा दिल्या, असं रोहित शर्मा म्हणाला.

7/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

मुंबई इंडियन्सकडून धावांचा पाठलाग करताना करताना ईशान किशन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या 9.4 ओव्हरमध्ये तब्बल 90 धावा केल्या. मात्र त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांचा पराभव झाला.

8/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

मुंबई इंडियन्सचे 13 सामने झाले असून 7 विजयांसहीत 14 गुण मिळवले आहेत. मुंबईचा शेवटचा सामना 21 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. मुंबईला काहीही करुन हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. इतकच नाही तर इतर संघांच्या कामगिरीवरही मुंबईला अवलंबून रहावं लागणार आहे. कारण आरसीबी आणि पंजाबचा संघही 16 गुणांपर्यंत झेप मारु शकते.

9/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

प्लेऑफ्ससंदर्भात रोहितला विचारण्यात आलं असता त्याने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं. "मला नाही ठाऊक की आकडे नेमकं काय सांगतात. मात्र आम्हाला पुढचा सामना काहीही झालं तरी जिंकावा लागणार आहे," असं रोहितने सांगितलं.

10/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

63 सामन्यानंतरही गुजरातच्या रुपाने केवळ एकमेवर संघ प्लेऑफ्ससाठी क्वालिफाय झाला आहे. टॉप 4 मध्ये येण्यासाठी अजूनही 7 संघांमध्ये चूरस कायम आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, कोलकाता, पंजाब, बंगळुरु, लखनऊ आणि राजस्थानचा समावेश आहे.

11/11

IPL 2023 Rohit Sharma Angry on Mumbai Indians

गुजरात सध्या नेट रन रेट बरोबरचं गुणांनुसारही पहिल्या स्थानी असून हा संघ प्लेऑफ्ससाठी क्वालिफाय झाला आहे. 13 सामन्यांमध्ये 9 विजयांसहीत 18 गुणांबरोबर +0.835 नेट रन रेट असणारा हा संघ आयपीएल 2022 चा विजेता संघ आहे.