IPL 2023 Photos : धोनीचे 7 खेळाडू जिंकून देणार आयपीएलचा कप; आता सुट्टी नाही...!

IPL 2023, CSK : धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 4 वेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे. 

Mar 20, 2023, 14:01 PM IST

IPL 2023, CSK : धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (MS Dhoni retirement IPL) घेतली असली तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. हा हंगाम त्याचा अखेरचा असणार आहे. त्यामुळे आता धोनीचे सात चेले धोनीला आयपीएलचा कप जिंकून देतील.

1/7

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) 2021 च्या हंगामातील इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला. ऋतुराजने 2020 मध्ये सुपर किंग्ससाठी पदार्पण केलं, जिथे त्याने हंगामाच्या शेवटी सलग तीन अर्धशतकांसह त्याच्या प्रतिभेची झलक दाखवली होती.

2/7

अंबाती रायडू (Ambati Rayudu) अंबाती रायडू हा एक स्टाईलिश मधल्या फळीतील फलंदाज आहे. 33 वर्षाच्या रायडूने 2018 च्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याचा अनुभव धोनीसाठी महत्त्वाचा ठरेल.

3/7

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) रवींद्र जडेजा सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक. चेन्नईच्या संघासाठी दुसरा मोठा खेळाडू आहे. धोनीच्या अनुपस्थितीत जडेजाकडे जबाबदारी दिली जाते. 

4/7

मोईन अली (Moeen Ali) इंग्लिश अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali) बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत त्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. धोनीच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा राहिलाय. आगामी आयपीएलमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची ठरेल.

5/7

बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लिश अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) धोनीसाठी सर्वात कामाचा खेळाडू ठरणार आहे. आपल्या जबदस्त कामगिरीच्या जोरावर स्टोक्सने इंग्लंडला विश्वविजेता बनवलंय. त्यामुळे आता तो धोनीला त्याचा शेवटचा आय़पीएल कप जिंकून देईल.

6/7

दीपक चहर (Deepak Chahar) मध्यम-गती गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याने 2018 च्या VIVO IPL सीझनमध्ये पॉवरप्ले दरम्यान मोठ्या प्रमाणावर गोलंदाजी करताना 12 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. तेव्हापासून तो धोनीचा खास गोलंदाज बनलाय.

7/7

काइल जेमिसन (Kyle Jamieson) काइल जेमिसनला चेन्नईने आयपीएल लिलावात 1 कोटी रुपयाच्या या मूळ किंमतीत विकत घेतलं. त्यामुळे आता चेन्नईच्या गोलंदाजीत धार पहायला मिळू शकते.