OnePlus 11R ला टक्कर देणार हा जबरदस्त स्मार्टफोन; फक्त 8 मिनिटांत 50% चार्ज होणार

स्मार्टफोन खरदी करताना कॅमेरा आणि रॅमसह बॅटरीचा देखील विचार केला जातो. यामुळे दमदार बॅटरी बॅकअप आणि सुपरफास्ट चार्जींग होणाऱ्या फोनला मोठी मागणी आहे. 

Jun 19, 2023, 00:17 AM IST

iQOO 7 Neo Pro : OnePlus 11R हा फोन सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. OnePlus 11R या फोनला टक्कर देण्यासाठी iQOO कंपनी आपला iQOO 7 Neo Pro हा  जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन फक्त 8 मिनिटांत 50% चार्ज होणार असा दावा कंपनीने केला आहे. 

 

 

1/7

या फोनमध्ये   50MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स असतील. तर सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा असेल. 

2/7

iQOO 7 Neo Pro हा फोन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच होवू शकतो. याची किंमत 40 हजार पर्यंत असू शकते. 

3/7

या फोनमध्ये  5000mAh असा तगडा बॅटरी बॅकअप असेल. 

4/7

 Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन काम करेल.  

5/7

या फोनमध्ये 120W चे फास्ट चार्जिंग असणार आहे. हा फोन केवळ 8 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. 

6/7

iQOO Neo 7 Pro स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर असणार आहे. 

7/7

iQOO भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.