बंदुकीच्या गोळ्याच काय, बॉम्ब टाकला तरी काही होणार नाही; Mahindra ARMADO जवानांचे रक्षण करणार

महिंद्रा ग्रुपने लाँच केलेले हे भारतातील पहिले आर्मड वाहन आहे. हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे चिलखती वाहन आहे. याचा वापर  भारतीय सैन्यासाठी केला जाणार आहे. 

Jun 18, 2023, 23:52 PM IST

Mahindra ARMADO : देशातील सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ग्रुप महिंद्राने भारतीय लष्कराला एक मोठी भेट दिली आहे. महिंद्रा ग्रुपने  Mahindra ARMADO आर्माडो हे नवीन आर्मर्ड वाहन लाँच केले आहे. हे वाहन  भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झाले आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे बंदुकीच्या गोळ्याच काय, बॉम्ब टाकला तरी या वाहनाला काहीच होणार नाही. हे वाहन जवानांचा शत्रुपासून बचाव करेल.

1/6

दहशतवादविरोधी कारवाया, अतीसंवेदनशील भागात पेट्रोलिंग आणि स्पेशल फोर्सच्या ऑपरेशनसाठी हे वाहन वापरले जाणार आहे. 

2/6

Mahindra ARMADO या वाहनात  B7 पातळी आणि SATNAG स्तर 2 बॅलिस्टिक संरक्षण मिळते. एएसएलव्ही सर्व बाजूंनी बॅलिस्टिक आणि स्फोटकांपासून संरक्षण करते.

3/6

Mahindra ARMADO केवळ 12 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडू शकते.  ताशी 120 किलोमीटर वेगाने शत्रूवर मारा करु शकते.

4/6

 हे पूर्णपणे स्वदेशी चिलखती वाहन आहे. यात एकावेळी पाच जण बसू शकतात. 

5/6

भारतीय लष्करासाठी आरमाडोची रचना, विकसित आणि भारतात निर्मिती करण्यात आली आहे. 

6/6

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी Mahindra Armado ALSV डिलिव्हरी सुरू केल्याची घोषणा केली.  हे भारतीय सशस्त्र दलांसाठी विकसित केलेले आर्मर्ड लाइट स्पेशलिस्ट व्हेईकल (ALSV) आहे.