उदयपुरमध्ये लक्झरी हॉटेलमध्ये लग्न करणार आयरा-नुपुर, 1 दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क

Ira Khan Wedding Venue : आमिर खानची मुलगा आयरा खान-नुपुर शिखरे 8 जानेवारी रोजी बांधणार लग्नगाठ. पहिल कोर्ट मॅरेज करून सगळ्यांच लक्ष वेधलं.   

| Jan 07, 2024, 10:26 AM IST

Ira Khan Marriage : आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने नुपुर शिखरेसोबत नुकतच कोर्ट मॅरेज केलंय. यावेळी दोघांचा लूक अतिशय साधा आणि सिंपल दिसत आहे. आता हे दोघं लग्नाला काय आऊटफिट घालणार किंवा दोघांचा लूक कसा असेल याकडे सगळ्यांच लक्ष असेल. 8 जानेवारी रोजी उदयपुरमध्ये रॉयल अंदाजात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि आयरा-नुपुर सगळे उदयपुरला पोहोचले आहेत. 

1/6

8 जानेवारी रोजी करणार लग्न

Ira Khan And Nupur Shikhare Wedding

आयरा-नुपुरने नुकतच कोर्ट मॅरेज केलं आहे. दोघंही यावेळी अतिशय वेगळ्या स्टाइल आणि लूकमध्ये दिसत आहे. या दोघांनी नंतर रिसेप्शन एन्जॉय केलं आहे. 8 जानेवारी रोजी दोघं रॉयल अंदाजात लग्न करणार आहे. यावेळी जवळचे लोक उदयपुरला रवाना झाले आहेत. 

2/6

ताज अरवाली हॉटेल

Ira Khan And Nupur Shikhare Wedding

उदयपूरच्या ताज अरवली हॉटेलमध्ये अत्यंत शाही पद्धतीने दोघांचे लग्न पार पडणार आहे. हे एक अतिशय आलिशान हॉटेल आहे. त्यात सर्व सुखसोयी आणि सुविधा आहेत. या लग्नाला 250 हून अधिक पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेलच्या आजूबाजूला हिरवीगार हिरवळ आहे, हे अतिशय सुंदर दृश्य आहे.

3/6

हॉटेलचे भाडे

Ira Khan And Nupur Shikhare Wedding

या हॉटेलमध्ये लक्झरी रुमसोबतच स्विमिंग पूल आहे. यामध्ये स्पा आणि जिम, फ्री वायफाय,बारची सुविधा आहे. या हॉटेलला 1 रात्रीचे जवळपास 25 हजार ते 29 हजार असणार आहे. तसेच लक्झरी टेंट पॅनापरोमा रुम देखील येथे उपलब्ध आहेत. 

4/6

स्पा आणि जिम

Ira Khan And Nupur Shikhare Wedding

या हॉटेलमध्ये आलिशान हॉटेलपासून ते पारंपारिक बाग, शांत आरोग्य, स्पा आणि जिम अशा सुविधा आहेत, ज्यामध्ये अतिशय उच्च दर्जाची मशीन्स ठेवण्यात आली आहेत, ज्यातून बाहेरचे दृश्य सुंदर दिसेल.

5/6

फॅमिली डायनिंग एरिया

Ira Khan And Nupur Shikhare Wedding

या हॉटेलमध्ये एक फॅमिली डायनिंग एरिया देखील आहे आणि संपूर्ण पार्श्वभूमी राजस्थानी लूकमध्ये सजवण्यात आली आहे. बाहेर एक बोनफायर आणि जेवणाची खास जागा तयार केली आहे. जिथे तुम्ही बसून गाणी ऐकू शकता. या हॉटेलच्या आजूबाजूला सुंदर पर्वत दिसतील.

6/6

जेवण

Ira Khan And Nupur Shikhare Wedding

या हॉटेलच्या खाद्यपदार्थांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला येथे प्रत्येक प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. जेवणाची चवही खास आहे. पण एक खास गोष्ट अशी आहे की इथे तुम्हाला राजस्थानी थाळी देखील मिळेल. यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींचाही समावेश केला जाणार आहे.