रेल्वेची मोठी वेटिंग तर बसमध्ये मिळणार सीट! ही आहे IRCTC नवी सुविधा

 IRCTC  जर तुम्हाला रेल्वेचे तिकीट न मिळाल्यास तुम्हाला बसमध्ये बसण्याची सुविधा मिळेल.

| Jan 05, 2021, 15:09 PM IST

IRCTC Latest News: IRCTC ने आपली नवीन वेबसाइट सुरू केल्यानंतर आयआरसीटीसीने त्यात अनेक नवीन सुविधा जोडल्या आहेत. समजा तुम्हाला आयआरसीटीसीकडून ट्रेनचे तिकीट मिळाले नाही तर आपण बसदेखील बुक करू शकाल. वास्तविक, आयआरसीटीसी बहु-मॉडेल वाहतुकीवर काम करत आहे, ज्यात रेल्वे प्रवास तसेच बस आणि हवाई प्रवासाचा समावेश आहे.

1/4

जर तुम्हाला दिल्ली ते कानपूर, लखनऊ किंवा जम्मूसारख्या थोड्या अंतरावरुन प्रवास करायचा असेल तर आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर तुम्ही बस बुक करू शकता. आयआरसीटीसी वेबसाईटवर बस बुकिंगसाठी रेड बस, अभि बसचा ( Red Bus, Abhi Bus) पर्याय असेल.

2/4

इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आयआरसीटीसी (IRCTC) बसच्या बुकिंगसाठी ट्रायल रनही करत आहे. 7 जानेवारीपासून ही चाचणी घेण्यात येणार आहे. ती आयआरसीटीसी वेबसाइटवर थेट Live होईल.

3/4

आयआरसीटीसीच्या (IRCTC) वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, रेड बस आणि अभि  ( Red Bus, Abhi Bus) बसमधून दिल्लीसह २२ राज्यांत प्रवास करता येईल.

4/4

बस बुकिंगसाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर जावे लागेल. यासाठी कोणताही स्वतंत्र आयडी तयार करावा लागणार नाही. आधीच तयार केलेल्या आयडीनेच तिकिट बुक केले जाईल.