इटालियन पीएम मेलोनींचा घटस्फोट, भारत दौऱ्यामुळे आल्या होत्या चर्चेत

Giorgia Meloni Separated :  इटलीच्या  पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तिची जोडीदार आंद्रिया जियाम्ब्रुनोपासून विभक्त झाल्या आहेत. शुक्रवारी त्यांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली.

Oct 20, 2023, 16:29 PM IST
1/10

जॉर्जिया मेलोनी यांचा जोडीदारासोबत ब्रेकअप

Giorgia Meloni Separated

इटलीच्या  पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तिची जोडीदार आंद्रिया जियाम्ब्रुनोपासून विभक्त झाल्या आहेत. शुक्रवारी त्यांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली.

2/10

सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Information provided through social media

मेलोनी यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. इटलीच्या पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी या टेलिव्हिजन पत्रकार भागीदार आंद्रिया जियाम्ब्रुनोपासून विभक्त झाल्याने जगभरात चर्चा सुरु झाली आहे.

3/10

अनेकांना बसला धक्का

Giorgia Meloni

गियामब्रुनो यांना काही आठवड्यापूर्वी केलेल्या केलेल्या लैंगिक टिप्पणीबद्दल टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 

4/10

जवळपास 10 वर्षे एकत्र

 Giorgia Meloni Almost 10 years together

माझे आंद्रिया जिआम्ब्रुनोसोबतचे नाते इथेच संपले. आम्ही जवळपास 10 वर्षे एकत्र राहिलो, असे जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं आहे. आमचे मार्ग बऱ्याच काळापासून वेगळे झाले आहेत. अशा परिस्थितीत आता ते स्वीकारण्याची वेळ आली आहे, असेही जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या.

5/10

जॉर्जिया मेलोनी पतीमुळे अडचणीत

Georgia Meloni is in trouble because of her husband

जॉर्जिया मेलोनी यांचा पती आंद्रिया जियाम्ब्रुनो एका सुप्रसिद्ध इटालियन वृत्तवाहिनीचा अँकर आहे. काही महिन्यांपूर्वी जियामब्रुनो एका महिलेशी अर्वाच्य भाषेत बोलताना दिसला होता. जियामब्रुनोने महिलेशी प्रेमसंबंधाबाबत चर्चा केली होती.

6/10

कोण आहेत जॉर्जिया मेलोनी?

Who is Georgia Meloni

जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. जॉर्जिया या इटलीच्या उजव्या विचारसरणीच्या पक्ष ब्रदर्स ऑफ इटलीचे नेते आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी, 2008 मध्ये, वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी, जॉर्जिया इटलीचे सर्वात तरुण मंत्री बनल्या होत्या. 

7/10

जॉर्जिया मेलोनी वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत

Georgia Meloni is constantly in the news due to her statements

मेलोनी या त्यांची विधाने आणि उजव्या विचारसरणीमुळे त्या सतत चर्चेत असतात. जॉर्जिया स्वत:ला मुसोलिनीचा वारस म्हणवून घेऊन एलजीबीटी समुदायाला विरोध केल्यामुळेही चर्चेत होत्या. 

8/10

जी-20 परिषदेसाठी भारतात

giorgia meloni in India for the G 20 summit

जी-20 परिषदेसाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भारतात आल्या होत्या. तेव्हा देखील मेलोनी यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती.

9/10

मेलोनींचे भारत प्रेम

Meloni love for India

मेलोनींचे भारतावरील प्रेम पाहून लोक त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांचे अनेक मीम्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

10/10

पंतप्रधान मोदींचे कौतुक

Appreciation of Prime Minister Modi

आमचे सरकार भारताशी संबंध पुढे वाढवेल. मला ठाम विश्वास आहे की एकत्र मिळून आपण बरेच काही करू शकतो आणि मला खात्री नाही की मी मान्यता रेटिंगच्या बाबतीत मोदीजींशी बरोबरी करू शकेन. मला वाटते की ते जगातील सर्वात आवडते व्यक्ती आहेत, असे मेलोनी म्हणाल्या होत्या.