Jaddanbai Story : वेश्यालयामध्ये झालं नरगिस यांच्या आईचं संगोपन! संजय दत्तच्या आजीसाठी दोघांनी केलं धर्मांतर; स्वीकारला मुस्लीम धर्म

Jaddanbai Story : संजय लीला भन्साळी यांच्या हिरांमडीमुळे तवायफ यांचं आयुष्यातील भयान वास्तव डोळ्या समोर आलं. पण खऱ्या आयुष्यात एक नरगिस यांच्या आईचं संगोपन हे वेश्यालयात झालं. 

May 12, 2024, 14:17 PM IST
1/9

चित्रपटसृष्टीचा एक काळ असा होता की, जेव्हा चित्रपटात महिलांनी काम करणे वाईट समजलं जायचं. एवढंच नाही तर चित्रपटात काम करण्याऱ्या अभिनेत्री तुलना ही गणिकासोबत केली जायची. मात्र या वाईट विचारसरणीला दुर्गाबाई ते फातिमा बेगम या महिलांनी मोडीस काढलं. त्यातील एक नाव होतं जद्दनबाई. हिचा जन्म वेश्यालयात झाला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ही वेश्यालयात संगोपन झालेली ही महिला चित्रपटसृष्टीतील पहिली महिला संगीतकार आहे.   

2/9

जद्दनाबाईं या प्रसिद्ध अभिनेत्री नरगिस दत्त यांची आई आहे. संजय दत्त हा त्यांचा नातू आणि सुनील दत्त हा त्यांचा जावई होता. जद्दनबाईचा जन्म कठीण प्रसंगात झाला. आयुष्यातील काटेरी वाटेवर चालताना त्यांनी समाजात मानाचं स्थान निर्माण केला. आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.   

3/9

जद्दनबाईंच्या आईचं नाव दलीपाबाई असून त्या प्रयागराजमधील वेश्यालयात तवायफ होत्या. या दुनियेत त्या जबरदस्ती आल्यात. झालं असं की, दलीपाबाई यांच्या लग्नाच्या वरातीवर डाकूंनी हल्ला केला होता. त्यावेळी या हल्ल्यात नवरदेवाला गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. त्यावेळी नवरी आणि काही लोकांनी कसा बसा जीव वाचविला. दलीपाबाई सासर पोहोचल्या. मात्र तिथे त्यांच्यावर अत्याचार झाला. अखेर वेदना सहन होत नाही म्हणून त्यांनी घर सोडलं. एके दिवशी काही लोकांनी त्यांना वेश्यालयात आणून सोडलं. 

4/9

या वेश्यालयात त्यांचं लग्न सारंगी तज्ज्ञ मियाँ जान यांच्याशी करण्यात आला. दलीपाबाई ब्राह्मण कुटुंबातील होत्या. लग्नानंतर त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारला. या लग्नातून त्यांना जद्दनबाई झाल्यात. आईप्रमाणे जद्दनबाईंनाही संगीतात रस होता. आईकडून ठुमरी आणि गझलमध्ये त्या पारंगत झाल्यात.   

5/9

जद्दनबाई यांचं ज्या वेश्यालयात संगोपन झालं तिथे महिला शरीर विक्री करत नव्हत्या. ते एक करमणूकची जागा होती. जद्दनबाईंचं तीन लग्न झाली होती. त्यांच्या प्रेमा गुजराती व्यापारी नरोत्तम दास वेडे झाले होते. त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारून त्यांच्या पहिलं लग्न केलं. त्यांना अख्तर हुसेन नावाचा मुलगा झाला. पण एक दिवस दास त्यांना सोडून निघून गेला. त्यानंतर जद्दनबाईचं दुसरं लग्न हे वेश्यालयात हार्मोनियम वादक उस्ताद इर्शादमीर यांच्याशी झालं. यांनाही एक मुलगा अन्वर हुसेन झाला.   

6/9

तिसऱ्या लग्नाच्या वेळी आता जद्दनबाईला भीती वाटत होती. दोन लग्न मोडले, दोन मुलं पदरात आणि तवायफ हा टॅग. अशात श्रीमंत घराण्यातील मोहन बाबू आपल्याशी लग्न का करणार. पण त्यांनी कोलकात्यात लग्न केलं. 

7/9

जद्दनबाईसांठी त्यांनी कुटुंब सोडलं आणि इस्लाम धर्म स्विकारला. या लग्नातून त्यांना फातिमा रशीद नावाची मुलगी झाली. हीच मुलगी पुढे जाऊन चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री झाली. तिचं नाव आहे नरगिस दत्त.   

8/9

जद्दनबाई आणि मोहन बाबू यांनी नंतर गायनात खूप काम करत अनेक शहरांमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतले. त्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होती. रोडिओसाठी ग्रामोफोनवर त्यांच्या गझल रेकॉर्ड करण्यात आल्या. हळूहळू त्यांचं नाव व्हायला लागलं आणि त्यांनी संगीत कंपनी उघडली.   

9/9

आई जद्दनाबाईने संगीत क्षेत्रात तर मुलगी नरगिसने अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. 11 मार्च 1958 नरगिस यांचं सुनील दत्तसोबत लग्न झालं. संजय, नम्रता आणि प्रिया दत्त यांची मुलं आहेत. नरगिस यांचं कर्करोगामुळे निधन झालं.