टीव्हीच्या 'त्या' अभिनेत्री ज्यांचा अभिनयासह शिक्षणांतही वरचष्मा

Top 5 Highly Educated TV Actresses : टीव्ही जगतातील अभिनेत्रींसाठी लोक खूप वेडे असतात. मग ती नागिन मालिकेतील नागिन असो किंवा दिया और बाती फेम दीपिका सिंग असो. या सर्व अभिनेत्रींची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या टेलिव्हिजन अभिनेत्री उच्चशिक्षित आहेत. काही एमबीए तर काही इंजिनिअरही आहेत ?

Aug 25, 2022, 18:37 PM IST
1/6

तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर खुप चर्चे आहे. तेजस्वी बिग बॉस 15 मध्ये विजेती बनली आणि तिने नागिन मालिका गाठली. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

2/6

जॅस्मिन भसीन (Jasmin Bhasin)

'टशन-ए-इश्क'मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या जस्मिनने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत 'दिल से दिल तक' या मालिकेत काम केलं आहे, त्याशिवाय त्याने अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. अभिनयासोबतच जस्मिनने अभ्यासातही टॉप केलं असून एमबीए केलं आहे.

3/6

सुरभि ज्योति (Surbhi Jyoti)

'कुबूल है' या मालिकेतील झोयाच्या व्यक्तिरेखेने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुरभी ज्योतीने या मालिकेत आधीपासूनच दबदबा निर्माण केला आहे. टीव्ही जगतात करिअर करण्यापूर्वी सुरभीने इंग्रजीमध्ये एमए केलं आहे.

4/6

रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit)

'रोबोट बहू'च्या भूमिकेत दिसल्यानंतर रिद्धिमा पंडितला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर रिद्धिमा 'बिग बॉस ओटीटी' आणि 'खतरों के खिलाडी' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही दिसली. तिने सोशियोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅजुएशनची पदवी घेतली आहे.  

5/6

दीपिका सिंह (Deepika Singh)

'दिया और बाती हम' अभिनेत्री दीपिका सिंगने मार्केटिंगमध्ये पदवी घेतली आहे. अभिनयासोबतच दीपिकाने तिच्या अभ्यासालाही महत्त्व दिलं आहे.

6/6

त्रिधा चौधरी (Tridha Chaudhary)

स्वाधीनता आणि दहलीज सारख्या मालिकांव्यतिरिक्त आश्रम वेब सीरिजमधून लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या त्रिधाने मायक्रोबायोलॉजीमध्ये ऑनर्स पदवी घेतली आहे.