'हा' खेळाडू तर अर्जुन तेंडुलकरपेक्षाही एक पाऊल पुढे; डेब्यू सामन्यात ठोकलं द्विशतक

सौराष्ट्र टीमचा फलंदाज जय गोहिलने त्याच्या पहिल्या म्हणजेच डेब्यूच्या रणजी सामन्यात द्विशतक झळकावलंय. असा पराक्रम करणारा तो सौराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरलाय.

Dec 15, 2022, 22:04 PM IST
1/5

एकीकडे अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणातच शतक झळकावलं आहे. तर दुसरीकडे अजून एका युवा खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केलीये. 

2/5

आसाममधील एसीए स्टेडियमवर जय गोहिलने तुफानी फलंदाजी केलीये. जयने 246 बॅाल्समध्ये 227 रन्स केलेत.   

3/5

डेब्यूच्या रणजी सामन्यात द्विशतक झळकावणारा जय गोहिल हा सौराष्ट्राचा पहिला खेळाडू आहे. अमोल मझुमदार, गुंडप्पा विश्वनाथ या दिग्गज फलंदाजांसह आणखी 12 खेळाडूंनी हा विक्रम केलाय

4/5

जय गोहिलशिवाय हार्विक देसाई या खेळाडूनेही 1088 रन्सची खेळी केली. सौराष्ट्रने पहिला डाव 487 धावांवर घोषित केला.

5/5

दरम्यान जय गोहिलला सौराष्ट्राचा पुढचा सुपरस्टार म्हटलं जातंय.