जेसिका एन्स्लो तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय

Jan 20, 2018, 16:20 PM IST
1/9

सोशल मीडियावर एक महिला जोरदार व्हायरल होत आहे.  लोक तिच्या फिटनेसचे दिवाने होत आहेत. तिने आपली फिगर अशी मेंटेंन केलेय की ती आपल्या वयापेक्षा २० वर्षांनी लहान दिसत आहे.   

2/9

ज्यावेळी या महिलेने आपल्या मुलींसोबतचा एक फोटो सोशल अकाऊंटवर पोस्ट केलाय. आपल्या दोन मुलींसोबतच्या या फोटोवरून त्यांच्यातील अंतरही सांगता येणे शक्य होत नाही. मात्र, लोकांनी कमेंट पोस्ट करत म्हटलेय, ती आई नाही तर या मुलींची मोठी बहीण वाटत आहे.

3/9

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असलेली ही महिला ४३ वर्षीय जेसिका एन्स्लो आहे. ती सात मुलांची आई आहे. जेसिकाचे इन्स्टाग्राम अकाऊंट खूप चर्चेत असून ते हिट झालेय.  

4/9

तिने आपल्या जिम वर्कआउटचे व्हिडिओही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. लोक तिच्या फिटनेसचे दिवाने असून तिच्याकडून फिटनेसचे सल्लेही मागत आहेत.

5/9

जेसिकाने इन्स्टाग्रामवर आपल्या प्रेग्नेंसीच्या काळातील आणि त्यानंतरचे काही फोटोही अपलोड केलेत. यामध्ये ती आपल्या फिटनेसबाबत अधिक जागृत आहे, हे कळते.

6/9

आपल्या एका पोस्टमध्ये जेसिका सांगते, प्रेग्नेंसीच्या काळात शरीरात मोठा बदल होतो. मात्र, शरीरावर मेहनत घेतली तर आपण पुन्हा फिट होऊ शकतो.

7/9

लोक तिला काही प्रश्न विचारतात की, सात मुले असून सुद्धा ती स्वत:ला फिट कसे ठेवले? यावर जेसिका सांगते, मला माझा पती चांगला पाठिंबा देता, त्याचा सपोर्ट हीच आपली ताकत आहे.

8/9

जेसिका सांगते, मला माझ्या मोठ्या मुलांकडूनही चांगला सपोर्ट मिळतो.

9/9

फिट राहण्याच्या ध्येयाबाबत जेसिका सांगते की, आपण आपल्यासाठी काही कडक नियम बनविले पाहिजे. त्या नियमांचे पालनही तसेच केल पाहिजे. असे केल्याने आपण आपल्यासाठी दररोज वेळ काढतो आणि फिटनेसवर भर देऊ शकतो.