महाराष्ट्र नव्हे, भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतोय सर्वाधिक पगार

Job News : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाहीये. किंबहुना 21 व्या शतकात जग पोहोचलं असलं तरीही इथं महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमीच पगार मिळतोय.   

Apr 03, 2024, 14:42 PM IST

Job News : नोकरी... महिन्याला खात्यात जमा होणारा पगार, त्या पगारातून भागणाऱ्या गरजा आणि क्षणिक का असेना पण याच पगारामुळं मिळणारा आनंद या सर्व गोष्टींची जणू एक साखळीच आहे. अशाच या नोकरी/ रोजगार आणि पगारासंदर्भातील एक रंजक आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. 

1/7

सर्वाधिक पगार

Job news this state in the country gives huge amount of salary know the list

Job News : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालातील आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक पगार देणाऱ्यांमध्ये दिल्ली आघाडीवर असून, इथं पुरुष कामगारांना सरासरी 14115 रुपये इतका पगार मिळतो. 

2/7

महिलांचा पगार

Job news this state in the country gives huge amount of salary know the list

महिलांना पगार देण्यात अनेकांचाच हात आखडता असणं ही एक शोकांतिका. कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगाराच्या संधी आहेत माहितीये?   

3/7

सरासरी पगार

Job news this state in the country gives huge amount of salary know the list

महाराष्ट्रात पुरूष कामगारांना सरासरी 7437 रुपये इतका पगार मिळतो. तर, महिलांना 5431 रुपये इतका पगार मिळतो. या आकड्यांवरून तुम्हाला पगारातील फरक लक्षात आलाच असेल. पगाराच्या याच यादीत महाराष्ट्र 18 व्या स्थानावर आहे.   

4/7

सर्वाधिक पगार देणाऱ्यांची यादी

Job news this state in the country gives huge amount of salary know the list

कामगारांना सर्वाधिक पगार देण्याच्या यादीत अनुक्रमे दिल्ली (14115 रुपये), केरळ (13761 रुपये), हिमाचल प्रदेश (11267 रुपये), उत्तराखंड (11174 रुपये), जम्मू काश्मीर (11162 रुपये) ही नावं आघाडीवर आहेत. 

5/7

बेरोजगारी

Job news this state in the country gives huge amount of salary know the list

देशात 15 ते 29 वर्षे या वयोगटातील सर्वाधिक बेरोजगारांचा आकडा ओडिशामध्ये असून, टक्केवारीमध्ये पाहायचं झाल्यास हा आकडा 40 टक्क्यांच्या घरात येतो. 

6/7

बेरोजगारांचा आकडा

Job news this state in the country gives huge amount of salary know the list

महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांचा आकडा 15 टक्के असून, यामध्ये 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. अहवालानुसार राज्यातील बेरोजगारीचं हे प्रमाण तुलनेनं कमी आहे.   

7/7

नोकरीच्या संधी

Job news this state in the country gives huge amount of salary know the list

देशात सर्वाधिक नोकरी किंवा रोजगार संधी गुजरातमध्ये असून, इथं 15 ते 29 वर्षे वयोगटातील सुशिक्षित तरुणांना अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.