Supermoon 2023 : गुरुपौर्णिमेला आज अद्भूत योग! वर्षातील सर्वात मोठा चंद्र, पृथ्वी अन् चंद्रातील अंतरही...

July 2023 Supermoon : आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर खगोलीय अद्भूत घटना घडणार आहे. आज वर्षातील सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. त्याला सुपरमून असं म्हणतात. सुपरमून आणि हरणाच्या शिंगांचा काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे का? 

Jul 03, 2023, 13:03 PM IST

July 2023 Supermoon : गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आज अजून एक सुंदर योगायोग जुळून आला आहे. या वर्षात आपल्याला चार सुपरमून पाहता येणार आहे. त्यातील पहिला सुपरमून म्हणजेच सर्वातील सर्वात मोठा चंद्राचं अद्भूत नजारा पाहिला मिळणार आहे. 

1/8

आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे. पौर्णिमेला पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर कमी होतं. त्यावेळी आपल्याला सुपरमून दिसतो.   

2/8

त्यामुळे आज खगोलप्रेमींना सर्वात मोठा आणि प्रखर प्रकाशमान असलेला सुंदर चंद्राचे दर्शन होणार आहे. 

3/8

सुपरमून साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. आकाश स्वच्छ असल्यास आपल्याला हे सुंदर दृश्य पाहता येणार आहे.

4/8

तज्ज्ञांच्या मते चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे समुद्राला भरती, ओहोटी मोठ्या प्रमाणात येते. 

5/8

तुम्हाला सुपरमून पाहायचा असेल तर चंद्रोदय आणि चंद्रास्त वेळ उत्तम असते. (पंचांगमध्ये पाहा चंद्रोदयाची वेळ - Panchang Today : आज गुरुपौर्णिमासह, मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि राहुकाळ)

6/8

आजनंतर 1 ऑगस्ट आणि 30 ऑगस्टला 'ब्लू मून' दिसणार आहे. त्यानंतर वर्षातील चौथा आणि शेवटचा सुपरमून 29 सप्टेंबरला असणारल आहे.   

7/8

भारतात सुपरमून असं म्हणत असले तरी अमेरिकेत या काळ्यात उन्हाळा असल्याने त्याला 'हॉट मून' असं संबोधतात. 

8/8

जुलै महिन्यातील पौर्णिमेला चंद्राला बक मून किंवा थंडर मून देखील म्हटलं जातं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुपरमून आणि हरणांच्या शिंगांचा जवळचा संबंध आहे. तो असा की, जुलै महिन्यात नर हरणांची नवीन शिंगे येतात त्यामुळे याला बक मून असं म्हणतात.