लटकलेली ट्रेन पाहून तुम्हीही थक्क व्हाल, एकदा बघाच

असाही एक देश आहे जिथे रेल्वे रुळाखाली धावतात. इथे लोक ट्रेनमध्ये उलटे लटकून प्रवास करतात असं सांगितलं जातं.

Jul 15, 2022, 18:58 PM IST

Hanging Train : भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटलं जातं. आपल्या देशातील हजारो गाड्या दररोज लाखो लोकांना त्यांच्या इच्छितस्थळापर्यंत पोहोचवतात. तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास केला असेल त्या शक्यतो लोखंडी रुळावरुन धावणारी असेल. पण जर तुम्हाला सांगितलं की अशी एक जागा आहे जिथे ट्रेन रुळांवरून धावत नाही तर खाली लटकतात. मग तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे अगदी खरं आहे.

1/4

या रिव्हर्स ट्रेनला हँगिंग ट्रेन म्हणतात. ही ट्रेन भारतात नाहीये. जर्मनीमध्ये टांगलेल्या ट्रेन धावतात. या गाड्या रुळावर न जाता उलटा लटकून आपला प्रवास करतात. या ट्रेनचा प्रवास इतर ट्रेनपेक्षा खूपच वेगळा आहे. या ट्रेनमध्ये लोक उलटे लटकून प्रवास करतात असे लोकांना वाटते, पण तसं नाही.

2/4

या गाड्या जर्मनीमध्‍ये वुपरटल सस्पेंशन रेल्वे अंतर्गत चालवल्या जातात. ही ट्रेन दररोज 13.3 किमी प्रवास करते. त्याच्या मार्गावर 20 स्थानके आहेत. या ट्रेनचा विचार करू नका की लोक उलटे प्रवास करतात. यामध्ये सामान्य गाड्यांप्रमाणे प्रवाशांसाठी आसनव्यवस्था आहे. ही ट्रेन जमिनीपासून 39 मीटर उंचीवर धावते.

3/4

ही लटकलेली ट्रेन जो कोणी पाहतो तो थक्क होतो. ही ट्रेन सुमारे 121 वर्षांपूर्वी 1901 मध्ये सुरू झाल्याचे सांगितलं जातं. जगातील सर्वात जुन्या मोनोरेलमध्ये तिची गणना होते, असं सांगितलं जातं. जर तुम्ही कधी जर्मनीला गेलात तर या ट्रेनमधून एकदा प्रवास करायलाच हवा.

4/4

 ही सस्पेंशन मोनोरेल जर्मनीच्या वुपरटल शहरात सुरू करण्यात आली. नद्या, रस्ते, धबधबे आणि इतर गोष्टी पार करून ही ट्रेन लटकून प्रवास पूर्ण करते. ही ट्रेन गेली 121 वर्षे धावत आहे. या लटकलेल्या ट्रेनमधून दररोज 82 हजार लोक प्रवास करतात.