कंगनाच्या 'इमरजन्सी' चित्रपटाची रिलीज डेट अखेर ठरली; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता कंगना चित्रपटात व्यग्र झाली आहे

Jun 25, 2024, 17:35 PM IST

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता कंगना चित्रपटात व्यग्र झाली आहे

1/5

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आता राजकारणात उतरली आहे. पहिलीच निवडणूक जिंकत ती खासदार झाली आहे. काही दिवसांपूर्वी कंगना राणौतने इंस्टाग्रामवर पोस्ट करत 'इमरजन्सी' चित्रपटाचं पोस्टर शेअर केले होतं. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

2/5

कंगनाने शेअऱ केलेल्या पोस्टमधून अखेर चित्रपट कधी रिलीज होणार याची माहिती देण्यात आली आहे. 6 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होईल.  'स्वतंत्र भारताच्या सर्वात गडद अध्यायाच्या 50 व्या वर्षाची सुरुवात' असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. 

3/5

सिनेमामध्ये कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कंगनानेच केले आहे. 

4/5

कंगना रणौतचा चित्रपट 'इमरजेंसी'ची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याआधी अनेकदा सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली होती. ऑक्टोबर 2023 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर 24 नोव्हेंबर करण्यात आली. त्यानंतर 14 जूनला प्रदर्शित करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.   

5/5

चित्रपटात कंगनासह श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, विशाख नायर, सतीश कौशिक, लॅरी न्यू यॉर्कर, क्रिस्टोफ गाइटबेट, मनवीर चौधरी, जेबा हुसैन, राजू कुमार हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.