Kareena Kapoor Party : 'पूरा लंडन ठुमकदा'; करीना कपूरची 'गर्ल गर्ल गॅंग' लंडनमध्ये करतेय धमाल

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

Jul 08, 2022, 14:45 PM IST

Kareena Kapoor Khan Party With Girl Gang : सैफ आणि मुलांसोबत लंडनला गेलेली करीना कपूर तिथे त्यांना सोडून तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे.

1/5

करीना कपूर खान लंडनला सैफ आणि मुलांसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. मात्र तिची गर्ल गर्ल गॅंगही कुटुंबासोबत लंडनला पोहोचली आहे. बरं, असं कसं होऊ शकतं की करीना तिच्या मित्रांसोबत पार्टी करणार नाही?

2/5

या संधीचा फायदा घेत करीना कपूर खान आणि तिच्या मैत्रिणींनी एकत्र पार्टी केली आणि लंडनच्या रस्त्यावर खूप धमालही केली. या फोटोंमध्ये, तुम्ही करीना कपूर खानसोबत तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि नताशा पूनावाला यांना देखील पाहू शकता.

3/5

असं असताना, चाहते मात्र मलायका अरोराला खूप मिस करतायेत. काही दिवसांपूर्वी मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पॅरिसला गेले होते. नुकतंच, हे कपल सुट्टीवरून भारतात परतलं आहे. म्हणून, या गर्ल गॅंगमध्ये मलायका नसावी असं बोललं जातं.  

4/5

या फोटोंवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षावर होतोय. सोशल मीडियावर करीनाचे हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.

5/5

करीना कपूरने याआधी करिश्मा कपूरसोबतही असाच अतिशय सुंदर फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोन्ही कपूर बहिणी कूल लूकमध्ये दिसत आहेत.