Bollywood Actors Bad Habits: कोणी अंघोळच करत नाही तर कोण खात नखं, 'या' सेलिब्रिटींच्या वाईट सवयी ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

सेलिब्रिटींना असलेल्या  काही वाईट सवयी ऐकूण तुम्हालाही नक्कीच बसेल धक्का...  

Dec 01, 2022, 18:00 PM IST

Bollywood Celebrities: प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती सवय तर नक्कीच असते. पण बऱ्याचवेळा लोकांच्या वाईट सवयी या सगळ्यांच्या लक्षात राहतात तर चांगल्या सवयींकडे लोक दुर्लक्ष करतात. असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे व्यसनाधीन झाले. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना अशा काही वाईट सवयी आहेत, ज्यांच्याविषयी ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल...

1/5

kareena kapoor khan sunny leone aamir khan shahrukh khan John Abraham bollywood celebrities bad habits

Kareena Kapoor: बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बेबोला नखं खाण्याची सवय आहे. तिला बऱ्याचवेळा नखं खातानं पाहायला मिळतं. असं म्हटले जाते की तिच्या या वाईट सवयीमुळे करीनाला बऱ्याचवेळा खोटी नखं देखील वापरावी लागली आहेत. 

2/5

kareena kapoor khan sunny leone aamir khan shahrukh khan John Abraham bollywood celebrities bad habits

Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान जे काही करतो ते सगळं एकदम पर्फेक्ट असतो असं आपण नेहमीच बोलतो. मात्र, आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं आमिरच्या एका वाईट सवयीचा खुलासा केला होता. आमिरला रोज अंघोळ करणं आवडत नाही. विशेषत: सुट्टीवर असतो तेव्हा तर मुळीच नाही. 

3/5

kareena kapoor khan sunny leone aamir khan shahrukh khan John Abraham bollywood celebrities bad habits

Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनची वाईट सवय म्हणजे तिला हात आणि पाय सतत धुण्याची सवय. आता तुम्हाला वाटेल की हात-पाय धुणं ही चांगली गोष्ट आहे, मग ती वाईट सवय कशी असू शकते. खरं तर सनीला दर 15 मिनिटांनी हात पाय धुण्याची सवय आहे, त्यामुळे तिला अनेकदा सेटवर पोहोचायला उशीर होतो.

4/5

kareena kapoor khan sunny leone aamir khan shahrukh khan John Abraham bollywood celebrities bad habits

Shahrukh khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा गेल्या 3 दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला शूजची इतकी आवड आहे की अनेकवेळा तो बेडवर शूज घालून झोपतो.

5/5

kareena kapoor khan sunny leone aamir khan shahrukh khan John Abraham bollywood celebrities bad habits

John Abraham: बॉलिवूडचा माचो मॅन जॉन अब्राहमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण या सुपरस्टारलाही एक वाईट सवय आहे. जॉनला विनाकारण पाय हलवण्याची सवय आहे. तो बसल्यानंतर पाय हलवत राहतो आणि त्याला इच्छा असूनही ही सवय सोडवता येत नाही.