Pataudi Palace Secrets: सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये दडलंय 89 वर्षांपूर्वीचं गुपित; कोणाला कानोकान खबरही नाही अन्...

Pataudi Palace Unknown Facts:  हिंदी कलाविश्वामध्ये काही कुटुंब अशी आहेत, ज्यांना राजेशाही थाट वारसा हक्कात मिळाला आहे. राजेरडवाड्यांचा काळ मागं लोटला असला तरीही या कुटुंबांची शान तसूभरही कमी झालेली नाही. असंच एक कुटुंब म्हणजे अभिनेता सैफ अली खानचं पतौडी खानदान. टायगर पतौडी यांचा मुलगा, सैफ अली खान याच्या वागण्याबोलण्यातूनही हा राजेशाही थाट झळकत असतो. 

Sep 18, 2024, 18:52 PM IST
1/7

पतौडी पॅलेस

saif ali khan home Secret of Pataudi Palace revealed by soha ali khan

Secret of Pataudi Palace: सैफ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी गुरुग्राम इथं तयार करण्यात आलेलं पतौडी पॅलेस ही अतिशय महत्त्वाची वास्तू. ही एक अशी सुरेख इमारतवजा वास्तू आहे ज्याची ख्याती संपूर्ण देशभरात पसरली आहे. 

2/7

पॅलेसमध्ये मुक्काम

saif ali khan home Secret of Pataudi Palace revealed by soha ali khan

सैफ आणि त्याची पत्नी, तसंच कुटुंबातीच अनेक मंडळी सुट्टीच्या निमित्तानं या पॅलेसमध्ये मुक्कामास येत असतात. इतकंच नव्हे, तर या पॅलेसमध्ये बऱ्याच चित्रपटांचं चित्रीकरणही करण्यात आलं आहे. अशा या पॅलेसमध्ये दडलंय एक रहस्य. 

3/7

गुपित

saif ali khan home Secret of Pataudi Palace revealed by soha ali khan

सैफची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खान, हिनं या पॅलेसच्या काही गुपितांवर उजेड टाकला. हल्लीच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सोहानं सांगितल्यानुसार या पॅलेसचा सर्व हिशोब आपली आई, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याकडे असतो. 

4/7

व्हाईटवॉश

saif ali khan home Secret of Pataudi Palace revealed by soha ali khan

हे पॅलेस इतकं मोठं आहे की इथं व्हाईटवॉश आहे,, कुठंही रंगकाम नाही. कारण, ते तुलनेनं स्वस्त पडतं. अनेक वर्षांपासून या पॅलेसमध्ये एकही नवी गोष्ट आली नसल्याचंही सोहानं सांगितलं. पॅलेसच्या इतिहासावरही सोहानं उजेड टाकला. 

5/7

सोहा

saif ali khan home Secret of Pataudi Palace revealed by soha ali khan

अभिनेत्रीच्या माहितीनुसार 1970 मध्ये सैफचा जन्म झाला आणि त्यामुळं तो प्रिन्स अर्थात राजकुमार ठरला. पण, सोहाच्या जन्मानंतर राजेरजवाजड्यांना दिले जाणारे किताब आणि ती परंपरा संपुष्टात आली होती. ज्यामुळं भाऊ राजकुमार असूनही बहीण सोहा मात्र राजकन्या झाली नाही. 'राजकुमार किंवा राजकन्या का किताब सोबत बऱ्याच जबाबदाऱ्या आणि मोठाली बिलंही घेऊन येतो', असं सोहा म्हणाली.   

6/7

वास्तू

saif ali khan home Secret of Pataudi Palace revealed by soha ali khan

सोहानं यावेळी आपल्या आजीआजोबांविषयीसुद्धा भाष्य केलं. तिची आजी भोपाळची बेगम होती. तर, आजोबा पतौडीचे नवाब. एकिकडे आजोबा खेळाडू म्हणून ख्यातनाम होते. आजींच्या वडिलांची मात्र त्यांच्यावर ईर्ष्या होती. त्याच कारणानं आजीच्या वडिलांवर प्रभाव पाडण्यासाठी म्हणून अभिनेत्रीच्या आजोबांनी हे पतौडी पॅलेस बांधलं होतं, पण इथंही संगमरवरासाठी पैसे कमीच पडले. 

7/7

बांधकामादरम्यान ..

saif ali khan home Secret of Pataudi Palace revealed by soha ali khan

सोहानं या मुलाखतीत एक गुपित उघड केलं, ती म्हणाली 'तुम्ही पाहिलं असेल की इथं ठिकठिकाणी कार्पेट आहे. खरंतर पॅलेसच्या बांधकामादरम्यान पैसे संपले, संगमरवरही संपला. त्यामुळं सिमेंट झाकण्यासाठी त्यावर हे कार्पेट लावले गेले'. अनेकांना भुरळ पाडणाऱ्या या पतौडी पॅलेससंदर्भातील ही गोष्ट आजवर कोणासमोर आली नव्हती. 1935 मध्ये या वास्तूची उभारणी करण्यात आली होती. ही वास्तू जवळपास 10 एकरांच्या भूखंडावर अतिशय दिमाखात उभी आहे...