Shani Gochar: नवं वर्ष या राशींसाठी ठरणार अडचणीचं, साडेसाती आणि अडीचकीचा असणार प्रभाव

Shani Sadesati: नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नव्या वर्षात नव्या संकल्पासह योजना आखल्या आहेत. मात्र ग्रहांची स्थिती अनुकूल आहे का? याकडेही पाहिलं जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 17 जानेवारीला शनि देव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे पाच राशींवर प्रभाव असणार आहे. 

Dec 01, 2022, 15:42 PM IST
1/5

Shani Transit 2023

शनि कुंभ राशीत प्रवेश करताच मकर राशीला साडेसातीचं तिसरं चरण सुरु होणार आहे. या स्थितीमुळे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. हे चरण त्रासदायक ठरू शकतं. 

2/5

Shani Transit 2023

जानेवारीपासून कुंभ राशीला साडेसातीचं दुसरं चरण सुरु होईल. त्यामुळे या राशीच्या जातकांनी सावध राहणं आवश्यक आहे. नोकरी आणि उद्योग करणाऱ्यांना हा काळ अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे निर्णय घेताना काळजी घ्या. 

3/5

Shani Transit 2023

मीन राशीला साडेसातीचं पहिलं चरण सुरु होणार आहे. मीन राशीच्या जातकांना यामुळे त्रास होऊ शकतो. यामुळे या राशीच्या जातकांनी सावधगिरीने निर्णय घ्यावा.  

4/5

Shani Transit 2023

शनि गोचर होताच वृश्चिक राशीला अडीचकी सुरु होणार आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो. वाद विवादापासून दूर राहिलेलंच बरं राहील. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय करा.

5/5

Shani Transit 2023

शनि गोचराचा कर्क राशीवरही प्रभाव असणार आहे. या राशीला अडीचकी सुरु होणार आहे. गुंतवणूक करताना काळजी घेणं गरजेचं आहे.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)