सलमान खानच्या सांगण्यावरून बदललं नाव, प्री स्कूलमध्ये केलं नर्सचं काम; आज आहे 40 कोटींच्या संपत्तीची मालकीण

Entertainment : सलमान खानच्या सांगण्यावरुन अभिनेत्रीने आपलं नाव बदललं होतं. एवढंच नाही तर हिंदीशिवाय ती साऊथ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आज तिचा 32 वाढदिवस ही अभिनेत्री साजरा करत आहे. 

| Jul 31, 2024, 09:07 AM IST
1/7

उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आज तिने आपली ओळख निर्माण केलीय. पण एकेकाळी अभिनेत्री तिच्या आईसोबत प्री-स्कूलमध्ये काम करायची. शाळेतील इतर शिक्षकांप्रमाणे तीदेखील लहान मुलांसोबत खेळायची, त्यांना कविता आणि लेखन शिकवायची एवढंच नाही तर गरजेच्या वेळी मुलांचे डायपरही बदलायची. 

2/7

आम्ही बोलत आहोत, मुंबईतील प्रसिद्ध व्यापारीची लेक आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्याबद्दल. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, कियारा हे तिचं खरं नाव नाही. तर तिचं खरं नाव आहे आलिया. सलमान खानच्या सांगण्यावरुन तिने तिचं नाव कियारा हे नाव केलं. कारण आलिया नावाची अभिनेत्री इंडस्ट्रीत होती. 

3/7

कियाराने फगली या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केलंय. 'जुग जुग जियो', 'एमएस धोनी द: अनटोल्ड स्टोरी', 'गुड न्यूज', 'कबीर सिंग' आणि 'शेरशाह' तर हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. 

4/7

तिने तेलुगु चित्रपट 'भारत अने नेनू' साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत काम केलंय. तर ज्युनियर एनटीआरसोबत 'विनया विधेया रामा'मध्ये झळकली होती. 

5/7

अभिनेत्रीने 7 फेब्रुवारी 2023 ला बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केलंय. कियारा पहिल्यांदा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'शेरशाह' चित्रपटात दिसली होती. 

6/7

'द फायनान्शियल एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार कियारा अडवाणीची एकूण संपत्ती 40 कोटींच्या घरात आहे. चित्रपटच आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून ती कमाई करते. तर कियारा एका चित्रपटासाठी सुमारे 3 कोटी मानधन घेते. 

7/7

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती राम चरणसोबत 'गेम चेंजर'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 3' देखील करत आहे.